*चारोळी क्रमांक १*
*शब्द:अक्षर,शब्द,वाक्य,काव्य*
अक्षर अर्थपुर्ण जुळताच शब्द
शब्दा-शब्दांनी बनले वाक्य
वाक्य योजता होते काव्य
काव्यात असे लयबद्ध यमक शक्य
*चारोळी क्रमांक २*
*शब्द:तास,दिवस,मास,वर्ष*
तास चोवीस होताच होई दिवस
दिवसांचे गणन तीस होता एक मास
मास होताच बारा सरे वर्ष
वर्षाची सरत्या बात असते खास
*चारोळी क्रमांक ३*
*शब्द:बालपण,तरुणपण,प्रौढपण,म्हातारपण*
बालपणीच्या गमती नसती तरुणपणी।।
तारुण्यातली कर्तव्य ,पायाभरणी प्रौढपणाची।।
प्रौढावस्थेत चाहूल वार्धक्याची।।
वार्धक्यास उपमा बालपणाची।।
*चारोळी क्रमांक ४*
*शब्द:अंडी,अळी,कोष,फुलपाखरू*
अंड्या-अंड्यातुन निघाली इवली अळी।।
अळीचेच रुपांतर होई कोषातूनी।।
कोषभेदूनी बाहेर पडे फुलपाखरू।।
फुलपाखरू स्वच्छंदी उडते फुलाफुलातुनी।।
*चारोळी क्रमांक ५*
* शब्द:जल,जलचर,
मत्स्य,मत्स्यकन्या *
जलात विहरती जलचर।।
जलचरात देखणे किती मत्स्य।।
मत्स्यरुपी आवडे मज मत्स्यकन्या।।
मत्स्यकन्या कल्पनाविलास नसे तुच्छ्य।।
— सौ.माणिक शुरजोशी
नाशिक
Leave a Reply