नवीन लेखन...

शब्दाविण कळले सारे

कोलाहला पासून दूर दूर शांत सागर किनारा. संध्याकाळची वेळ आणि ओलसर वाळूची बैठक. समुद्रातून ये-जा करणारा एखाद दुसरा पडाव. मधेच निरव शांततेचा भंग करणारा कुठल्यातरी गिरणीचा भोंगा. किनाऱ्यावरील लाटांचे अविरत शहनाई सारखे पार्श्व संगीत. घराच्या ओढीने परतणारे पक्षांचे थवे.

संकेता नुसार क्षितिजावर भेटून आकाशाशी रममाण झालेली धरती. मावळतीस निघालेल्या सूर्यास त्यांचे गुपित कळल्याने लाजून आरक्त झालेले आकाश व अंधार ओढून घेउन लाज लपवू पाहणारी धरती. कळून न कळल्याचे भासवून त्यांची दखल घेण्यास फुरसत नसलेला व सर्व जीव सृष्टीच्या कल्याणासाठी अखंड पणे कालक्रमण करणारा मार्गस्थ दिवाकर!

या सर्वांच्या साक्षीने सहजीवनाच्या मार्गावर एकत्र पाउल टाकण्यासाठी एकमेकांचे मनोगत जाणून घेण्यास आतुर तो आणी ती.

सुरवात कशी करावी या दुविधेत असलेला तो, व्यक्त होण्यास मार्ग शोधत होता. शंका – कुशंकांनी तो बे चैन होता. आता पर्यंतच्या मिळालेल्या तिच्या सहावासास मुकण्याची भिती त्याचे अव्यक्त मन त्यास व्यक्त होण्यापासून परावृत्त करीत होते.

अधो वदनाने ओल्या वाळूत रेघोट्या ओढण्याचा चाळा करीत कसल्यातरी गुढ विचारात गढलेल्या तिला तो अनिमिष नेत्राने न्याहाळत होता. तिचे वाऱ्यावर भुरभुरणारे केस, हाताने सावरताना जाणीव पूर्वक टाकलेला तिचा नेत्र कटाक्ष, त्याच बरोबर हलकेच खालचा ओठ दुमडत केलेले स्मित हास्य त्यास भुरळ पाडीत होते. त्याच्या उचंबळून येणाऱ्या भावना तिच्यापाशी व्यक्त करण्याचा निर्धार पक्का होत होता पण भावनांच्या कोलाहलात त्यास शब्दच सुचत नव्हते.

लाजऱ्या नजरेने त्याच्याकडे चोरून बघणाऱ्या तिला त्याची होणारी चलबिचल जाणवत होती. त्यास काहीतरी सांगायचे आहे हे तिला कळले होते. त्यास जे काही सांगायचे आहे ते ऐकण्यास ती देखील तितकीच आतुर होती. तिला मनोमन खात्री होती की तिला अपेक्षित तेच त्यास सांगायचे आहे. त्याच्या ह्रीदयातील बोल त्याच्या ओठातून ऐकण्यास आसुसली होती. ते ऐकण्यास कानात जीव आणून ती केंव्हा पासूनच वाट पाहत होती.. ‘नको ना आता अंत पाहूस.’ मान वर करीत त्याच्या डोळ्यात डोळे मिसळत तिच्या गहिऱ्या डोळ्यांनी त्यास साद घातली.

डोळ्यांची भाषा डोळ्यांस समजली.

सुखावलेल्या त्याने तिचा हात हातात घेत हलकेच दाबला. त्याच्या त्या अश्वस्त हाताच्या स्पर्शाने मोहरून तिने आपली मान त्याच्या खांद्यावर विश्वासाने विसावली.

त्यास एकदम उमगले. भावना व्यक्त करण्यास वा समजून घेण्यास शब्दांची नव्हे तर त्या समजून घेणाऱ्या ह्रीदयाची गरज आहे. मनोमिलनाची आवश्यकता आहे. दोघांनाही आता शब्द-जंजाळात अडकण्याची गरज नव्हती. ऐकण्या बोलण्या साठी आता आयुष्य पडले होते.

— अविनाश यशवंत गद्रे

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..