अपत्याचं नांव ठेवण्याचा विधी. अपत्य जन्मानंतर जनरली १२ व्या दिवशी हा विधी पार पाडला जातो.
आपल्यापैकी बर्याच जणांना हा विधी ‘बाराव्या’ दिवशी करतात म्हणून त्याला ‘बारसं’ म्हणतात असे वाटते. मलाही असच वाटायचं पण नंतर शब्दांचा अभ्यास करताना अनेक गोष्टी कळत गेल्या त्यापैकी एक ‘बारसं’ हा शब्द आहे. ‘जे जे आपणांसी ठावे, ते ते जनांसी सांगावे..’ या उक्तीनुसार मी हे आपल्यापर्यंत पोचवत आहे.
असो. हा विधी प्रत्यक्षात ‘बारसं किंवा बारसा’ असा नसून माझ्या घरी ‘वारस’ आला आहे हे जाहीर करण्याचा विधी आहे.
‘वारस किंवा वारसा’ या शब्दाचा अपभ्रंश काळाच्या ओघात ‘बारसं’ किंवा ‘बारसा’ असा झाला.
आता हा विधी बाराव्या दिवशी का करतात हा स्वतंत्र विषय असून त्याची मुळं आपल्या महाराष्ट्राच्या आद्य इतिहासात आहेत.
बारामती, बारगाव इ. गावांची नांवं, डझनात मोजा़यची पद्धती, पेशवाईतलं बारभाईंच कारस्थान इ. ‘बारा’ कॉमन असलेल्या गोष्टी व ‘बारसा’ या सर्वांचा संबंध १२ या संख्येशी आहे व तो तसा का आहे हे पाहाणं मजेशीर आहे. त्याबद्दल पुन्हा केंव्हातरी लिहेन.
-गणेश साळुंखे
९३२१८११०९१
बारशाच्या वेळी फुले उधळणे