वाजले किती हा निदान आपल्या मुंबईकरांचा अतिशय जिव्हाळ्याचा प्रश्न. शहरी आयुष्यच घड्याळाच्या काट्याला बांधले गेल्याने हा प्रश्न आपण स्वतःला किंवा दुसऱ्याला विचारणे अत्यंत स्वाभाविक आहे.
पण वेळ वाजताना कधी ऐकलीय का?
मग वेळेला ‘वाजले’ हा शब्द का वापरला जातो?
तर मित्रानो या ‘वाजले’चे मूळ आपल्या प्राचीन संस्कृतीत आहे. घड्याळांचा शोध लागण्यापूर्वी गावात किंवा नगरात लोकांना वेळेची जाणीव करून देण्यासाठी एक मोठी पितळेची थाळी वाजवायची पद्धत होती. दोन ची वेळ झाली असता दोनदा ती थाळी वाजवायची आणि बाराची झाली असता बारा वेळा. इथेच ‘वाजले किती ?’ या वाक्याने जन्म घेतला आणि पुढे घड्याळाचा शोध लागल्यावर तरी हा वाक्प्रयोग पुढे चालू राहिला.
जाता जाता –
गावात वेळ दर्शवण्यासाठी जी पितळेची थाळी वाजवत त्या थाळीला फारसीमध्ये ‘तश्त’ असे म्हणतात. याच ‘तश्त’ चा बोलीभाषेत ‘तस्त’ असा अपभ्रंश झाला व पुढे कालांतराने त्याचाच ‘तास’ झाला. ‘किती तास झाले?’ याचा इतिहास असा आहे. ( इंग्रजी Dish पण या वरूनच आला असावा )
‘घड्याळ’ शब्द सरळ सरळ ‘घटिका’ या शब्दावरून आला आहे तर गुजराती ‘कलाक’ हा शब्द इंग्रजी ‘Clock’ चा अपभ्रंश आहे आणि हिंदीतील ‘कितना घंटा’ हा प्रश्न सरळ सरळ Church Bell वरून आला आहे.
— गणेश साळुंखे
९३२१८११०९१
Leave a Reply