चाहत्यांतर्फे किंग खान ही उपाधी मिळालेला शाहरूख खान दिलीप कुमार आणि अमिताभ बच्चन यांच्यानंतर हिंदी चित्रपटसृष्टीचा विशिष्ट काळ गाजवणारा अभिनेता म्हणूनही ओळखला जातो. त्याचा जन्म २ नोव्हेंबर १९६५ रोजी झाला. वीसेक वर्षांपूर्वी “फौजी’ नावाची मालिका दूरदर्शनवरून प्रसारित व्हायची. अल्पावधीत लोकप्रिय झालेल्या या मालिकेतील नायकाने प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान मिळविले. रुपेरी पडद्याच्या दिशेने टाकलेले शाहरुख खानचे ते पहिले पाऊल होते. त्यानंतर “दिल दरिया’, “दूसरा केवल’, “सर्कस’ अशा काही मालिकांमध्ये त्याने काम केले. “दीवाना’ या चित्रपटानंतर त्याने टीव्हीसाठी काम थांबवले. चित्रपटांतच त्याला भरभरून यश मिळाले.
आमीर खानने सोडलेला रोल शाहरुख खानने पटकावला आणि इथूनच यश चोप्रा-शाहरुख खान हे नवे कॉम्बिनेशन जन्मले. आमीर खानची चूक त्याच्यासाठी एक नवा प्रतिस्पर्धी निर्माण करून गेली. प्रत्येक सीनचा किस पाडणारा आमीर खान आणि कथा काय आहे, हेही न विचारणा शाहरुख खान या दोघांच्यात यश चोप्राने शाहरुख खानची निवड केली. शाहरुख खान सुपरस्टार झाला १९९२ मध्ये प्रदर्शित दीवाना या चित्रपटाद्वारे बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. बाजीगर, डर या चित्रपटांमध्ये खलनायकाच्या भूमिका त्याने साकारल्या.
१९९५ सालच्या आदित्य चोप्रा दिग्दर्शित दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे ह्या चित्रपटामध्ये प्रणय नायकाची भूमिका करून आपली पडद्यावरील प्रतिमा बदलली. त्यानंतर करण जोहर याच्या दिग्दर्शनाखाली कुछ कुछ होता है, कभी खुशी कभी गम या चित्रपटांत त्याने भूमिका केल्या. पडद्यावरची त्याची व काजोलची गाजलेली लोकप्रिय जोडी आहे. शाहरूख खानने ५० पेक्षा अधिक हिंदी चित्रपटांमध्ये भूमिका केल्या. त्याला १४ फिल्मफेअर पुरस्कार मिळाले असून फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेता पुरस्कार आठ वेळा मिळवणारा तो दिलीप कुमारसह दुसराच अभिनेता आहे.
२००५ साली त्याला भारत सरकारतर्फे पद्मश्री पुरस्कार देण्यात आला. रेड चिलीज एंटरटेन्मेन्ट ह्या कंपनीचा तो सह-मालक आहे. भारतीय प्रिमीयर लीगमधील कोलकाता नाईट रायडर्स ह्या संघाचा देखील तो सह-मालक आहे. मात्र, सुपरस्टार झाला तरीही शाहरुखने टीव्हीबरोबर आपले नाते तोडले नाही. “कौन बनेगा करोडपती?’, “क्या, आप पॉंचवी पास से तेज है?’, “जोर का झटका- टोटल वाइप आउट’ यासारखे “रिऍलिटी शो’ तो आतापर्यंत करत आला. २००८ मध्ये न्यूजवीक साप्ताहिकाने शाहरूखला जगातील ५० सर्वात प्रभावशाली व्यक्तींमध्ये स्थान दिले तर २०११ मध्ये लॉस एंजेल्स टाइम्स वृत्तपत्राने त्याचा जगातील सर्वात यशस्वी चित्रपट अभिनेता ह्या शब्दांत गौरव केला. आज त्याची जी ‘रोमँटिक हिरो’ म्हणून ओळख आहे, त्यामागे त्याची अफाट मेहनत आहे ‘बादशहा‘ चित्रपटानंतर बॉलिवडूचा बादशहा म्हणून, तर कधी किंग खानला संबोधले जाते. भारताबरोबरच विदेशातही शाहरुखच्या चाहत्यांची संख्या प्रचंड आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
Leave a Reply