तप्त सळई स्पर्ष करीतां , चटका देई शरीराला ।
सुप्त अशी औष्णिक शक्ति, आस्तित्व दाखवी त्या वेळेला ।।
वीजा चमकूनी गर्जती मेघ, लख्ख उजेड सारते काळोख ।
प्रकाश नि ध्वनीच्या लहरी, आस्तित्वाची दाखवी झलक ।।
साधी असे तार तांब्याची, झटका देई विद्युत असतां ।
विद्युत शक्तीचा परिणाम, जाणवी देहा प्रवेश करतां ।।
झाडावरले पडता फळ, भूमी घेई खेचूनी त्याला ।
गुरुत्वाकर्षण शक्ति ही, झलक दाखविते जगाला ।।
ईश्वर अस्तित्व भासे, अशाच शक्तीरुपानें ।
अद्दष्य असुनी परिणाम, दाखवी सुप्त गुणानें ।।
— डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
फारच छान.
विश्वातील ४ मूलभूत भौतिक बलंच विश्वाचा कारभार चालवितात. ही बलं कशी निर्माण झाली याची कल्पना करणं मानवी मेंदूच्या मर्यादेपलीकडचं आहे.