जयकिशन यांचे पूर्ण नाव जयकिशन दयाभाई पांचाल. त्यांचा जन्म ४ नोव्हेंबर १९२९ रोजी झाला. हा सुरांचा जादुगार! दुसरा शब्द नाही. जयकिशन लहानपणापासूनच ते हार्मोनियमवर गाणी वाजवत. सुप्रसिद्ध गुजराती दिग्दर्शक चंद्रवदन भट्ट यांच्याकडे संधीसाठी चकरा मारत असतानाच त्यांची गाठ शंकर (शंकरसिंह रघुवंशी) या आणखी एका होतकरू संगीतकाराशी पडली. शंकरही संधीच्या शोधात फिरत होते. जयकिशन त्या काळी पृथ्वी थिएटरसाठीसुद्धा काम करत. त्यामुळे पृथ्वीराज कपूर यांच्याशी ओळख झाली.
शंकर यांनी जयकिशन यांनाही पृथ्वी थिएटरमध्ये बोलावून हार्मोनिअम वाजवायचे काम मिळवून दिले. त्यांच्या सोबतच पृथ्वी थिएटरमध्ये एक गोरा देखणा तरूण आपल्या निळ्या डोळ्यांत नव्या चित्रपटाची स्वप्ने घेवून फिरत होता. त्याने आग नावाने पहिला चित्रपट काढला. त्या चित्रपटाला संगीत देणार्या ला राम गांगुली यांना सहाय्यक म्हणून शंकर काम करत होते. दुसर्यात चित्रपटाच्यावेळी त्या तरूणाच्या लक्षात आल्या की जुन्या लोकांशी आपले जमणार नाही. समवयस्क शंकरसोबत त्याच्या काळजाच्या तारा जुळल्या.
शंकरने जयकिशनला सोबत घेण्याचा आग्रह धरला. त्याचे नाव राज कपुर. पृथ्वी थिएटर ची निर्मिती “बरसात” या चित्रपटासाठी राज कपूर हे संगीतकार म्हणून नवीन जोडीच्या शोधात होते त्यांनी शंकर आणि जयकिशन यांच्यावर ती जबाबदारी सोपवली. आणि १९४८ साली प्रदर्शित झालेल्या “बरसात” ची गाणी सुपरहिट झाली आणि इथून पुढे शैलेंद्र, हसरत जयपुरी, लता मंगेशकर, मुकेश आणि शंकर – जयकिशन यांनी भारतीय संगीत क्षेत्रात एक इतिहास घडवला. हे दोघेही काही काळ त्याकाळचे प्रसिद्ध संगीतकार हुस्नलाल- भगतराम यांच्या हाताखाली सहायक म्हणून काम करत होते.
शंकर – जयकिशन या जोडीने जवळजवळ १७० हून जास्त चित्रपटांना संगीतसाज चढवला. ज्यामध्ये विशेष संगीतामुळे गाजलेले बादल, सीमा, बसंत बहार, चोरी – चोरी, कठपुतली, यहुदी, अनाडी, छोटी बहन, दिल अपना और प्रीत पराई, जिस देश मे गंगा बहती है, जंगली, प्रोफेसर, दिल अपना और प्रीत पराई, हमराही, राजकुमार, आम्रपाली, सुरज, तिसरी कसम, मेरा नाम जोकर, असली नकली इत्यादी चित्रपटाचा समावेश होतो. त्यांना चोरी – चोरी , अनाडी, दिल अपना और प्रीत पराई, प्रोफेसर, सुरज, ब्रम्हचारी, मेरा नाम जोकर, पहचान, आणि बेईमान या चित्रपटासाठी एकूण नऊ वेळा सर्वश्रेष्ठ संगीतकार म्हणून फिल्मफ़ेअर पुरस्कार मिळाला आहे.
शंकर जयकिशनचे नाव काढले की पहिल्यांदा राज कपुरच डोळ्यांसमोर येतो व मुकेशचा आवाज आपल्या कानात घुमायला लागतो. ‘शंकर-जयकिशन’ यांनी गोपनीयता म्हणून कुठल्याही गीताची चाल वैयक्तिक कुणी बांधली ते कुणालाही सांगायचे नाही असा एक अलिखित नियम पाळला होता. मात्र संगम चित्रपटातील एक गीत “ये मेरा प्रेमपत्र पढकर तुम नाराज न होना!” हे बिनाका गीतमाला या नभोवाणीवरील एका कार्यक्रमामध्ये खूप दिवस प्रथम क्रमांकावर वाजू लागले आणि जयकिशन यांनी हे गीत मी रचले असे सांगून तो नियम मोडला.
मो. रफी आणि राज कपूर यांनी त्यांच्यातील मतभेद मिटवून त्यांच्यामध्ये समन्वय निर्माण केला. गोरापान चेहरा, गोबरे गाल व कपाळावर रुळणाऱ्या रेशमी काळ्याभोर बटा – एखाद्या हिरोला लाभावे असे व्यक्तिमत्व. पण टेबलवरील हार्मोनियमवर बोटे फिरू लागली की, त्यातून स्वर्गीय गोडीचे सुर पाझरू लागत. संगीतकार जयकिशन यांचे हेच तर वैशिष्ट्य होते. ‘शंकर-जयकिशन’ या संगीतकार जोडीतील संगीतकार … संगीत दोघांच्याही रक्तात वहात होते. पुढे ही मैत्री इतकी घट्ट झाली की जयकिशन यांच्या अकाली जाण्यानंतरही १६ वर्षे एकट्या शंकर यांनी चित्रपटांना संगीत दिले पण नाव मात्र ‘शंकर जयकिशन’ असेच ठेवले होते. तसा त्या दोघांत करारच झाला होता असं म्हणतात. गुजरात मध्ये त्यांच्या जन्मगावी त्यांचा पुतळा उभारण्यात आला आहे.
जयकिशन १२ सप्टेंबर १९७१ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ:- इंटरनेट
Leave a Reply