शांत सागरी कशास उठविलीस वादळे?……….. शांत सागरी कशास उठवतोस वादळे?
गायिले तुवा कशास गीत मन्मनातले?…………. भांडुन भांड्यावर भांडे कशास आदळे?
काय हे तुझ्यामुळे……………………… पहा किती तुझ्यामुळे
देहभान हरपले………………………… गृहशांतता हरपते
युगसमान भासतात आज नाचरी पळे………….. युगसमान भासतात क्षण एकैक त्यामुळे
अमृतमधुर बोल एक…………………….. खडाजंगी बोल तव
श्रवणि जो न पाडिलास…………………… श्रवणि माझ्या पाडतोस
अधिरता भरे जिवात केवढी तयामुळे………….. भयभीती मनी भरे केवढी तयामुळे
स्वर्ग कल्पनेतला……………………….. स्वर्ग कल्पनेतला
येइल कधि भूतला………………………. केव्हाच विरुन पार गेला
दिवसरात्र अंतरात आस ही उचंबळे…………… दिवसरात्र अंतरात त्रस्तता उचंबळे
– संजीवनी मराठे………………………. – आकाश विहारकर
Leave a Reply