२३ डिसेंबर १९७० रोजी संध्याकाळी, बिर्ला मातोश्री सभागृह, मुंबई येथे नटसम्राटचा पहिला प्रयोग झाला. गोवा हिंदू असोसिएशनने हे नाटक मंचावर आणले होते. संस्थेचा सुवर्णमहोत्सवातला हा प्रयोग होता. या नाटकाचे दिग्दर्शन केले होते श्री. पुरुषोत्तम दारव्हेकर यांनी. आप्पासाहेब बेलवलकरांची भूमिका केली होती डॉ. श्रीराम लागू यांनी; तर कावेरी साकारली होती शांता जोग यांनी. वि.वा. शिरवाडकर यांच्या नटसम्राटमध्ये बेलवलकरांच्या भूमिकेत असलेले श्रीराम लागू, दत्ता भट, सतीश दुभाषी आणि चंद्रकांत गोखले या चारही नटसम्राटांच्या बरोबर, पत्नी कावेरी हिची भूमिका शांता जोग यांनी साकारली होती.
शांता जोग यांचे नाव टिळकनगर, चेंबूर (मुंबई) येथील एका रस्त्याला दिले गेले आहे. ’शांता जोग करंडक’ हा एका नाट्यस्पर्धेत बालनाट्याला दिला जाणारा पुरस्कार आहे. ’महाराष्ट्र नाट्यवर्धक मंडळा’ने आयोजित केलेल्या एकांकिका स्पर्धेनंतर विजयी एकांकिकेस ’शांता जोग स्मृती करंडक’ दिला जातो.
शांता जोग यांचा जन्म २ मार्च १९२५ रोजी झाला. शांता जोग यांचे १२ सप्टेंबर १९८० रोजी अपघाती निधन झाले.
संजीव वेलणकर, पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ:- इंटरनेट
Leave a Reply