आयरिश रिपब्लिकन आर्मीकडून होणार्या अत्याचाराचा तिने प्रत्यक्ष अनुभव घेतला आणि या अत्याचाराविरुद्ध आवाज उठविण्यासाठी तिने पुढाकार घेऊन चळवळ सुरु केली. तिने काढलेल्या शांती मोर्चात दहा हजारांपासून चाळीस हजारांपर्यंत महिला सामील व्हायच्या. याच शांतिकार्यासाठी तिला १९७६ मध्ये नोबेल पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
बेट्टी स्मिथ विल्यम्स हे त्या सामाजिक कार्यकर्तीचे नाव. तिच्याबरोबर मेयरीड कोरिगन हिलाही नोबेल हा बहुमान मिळाला.
उत्तर आयर्लंडमधील एंडरसन या शहरात २२ मे १९४३ रोजी बेट्टीचा एका ख्रिश्चन कुटुंबात जन्म झाला. तिचे वडील प्रोटेस्टंट पंथाचे मात्र आई कॅथालिक होती. तिचे कॅथालिक म्हणून पालनपोषण झाले असले, तरी तिला हा भेदभाव मान्य नव्हता. बालपणापासून बेट्टीवर तिच्या आजोबांचा विशेष प्रभाव होता. ते यहुदी होते व त्यांच्या परिवारातील बरेच सदस्य दुसर्या महायुद्धात मारले गेले होते. आई सतत आजारी असल्यामुळे बेट्टीला घरातील सारे कामकाज सांभाळायची सवय होती.
तिला जगातील इतर राजकीय घडामोडींबाबत विशेष रुची होती. १९६८ मध्ये प्रोटेस्टंट व कॅथोलिकांमध्ये गृहयुद्ध झाले. त्यातच आयरिश रिपब्लिकन आर्मीने केलेल्या ८००० सर्वत्र हिंसाचार सुरु झाला. या हिंसाचारात बेट्टीच्या दोन निरपराध नातेवाइकांचाही बळी गेला. त्यामुळे तिने या हिंसाचाराविरुद्ध शांततामय आंदोलन सुरू केले. शांतीच्या उद्दिष्टाने प्रेरित झालेल्या बेट्टीने घरोघरी जाऊन नागरिकांच्या सह्या गोळा करण्यास प्रारंभ झाला. त्यामुळे तिने दिलेल्या शांती मोर्चाच्या हाकेला चांगला प्रतिसाद मिळू लागला. मोर्चात कधी दहा, कधी वीस तर कधी चाळीस हजारहून अधिक महिला सहभागी होऊ लागल्या. त्यामुळे सरकारवर दबाव येऊ लागला.
याच शांतिकार्यासाठी बेट्टीला व तिच्याबरोबर काम करणाऱ्या कोरिगनला नोबेल पुरस्कार मिळाला. नोबेल मिळाल्यानंतर देखील प्रोटेस्टंट तसेच कॅथोलिकांकडून बेट्टी व कोरियन धमक्या येऊ लागल्या; मात्र त्यांनी आपले शांतिकार्य पुढे चालू ठेवले.
बेट्टी विल्यम्सचे अखेरचे आयुष्य फ्लोरिडात गेले.
Leave a Reply