आजपासून शारदीय नवरात्र पर्वकाळ सुरु झाला आहे. दुर्गामातेची विविध रुपे या रुपाने पहावयास मिळतात. देवी पुराणात दुर्गारुप हे माता पार्वतीचेच असल्याचे कथन केले आहे. पार्वतीने महिषासूर मारला. त्या प्रसंगाचे वर्णन या ऊत्सवकाळात ऐकवले जाते…गायले जाते….!
हा एकूण दहा दिवसांचा सण प्रतिकात्मकतेच्या दृष्टीने अनन्यसाधारण महत्वाचा असा ऊत्सव असून या काळात माता दूर्गेचं चैतन्य पृथ्वीवर असतं. या नऊ दिवसांत देवीच्या शक्तिची अर्थात नऊ रुपांची पूजा केली जाते. अशाप्रकारची ननवरावृत्रे वर्षातून चार वेळा असतात. पौष, चैत्र, आषाढ आणि अश्विन या महिन्यात प्रतिपदा ते नवमी या तिथीला हा ऊत्सव असतो.
महालक्ष्मी, महासरस्वती आणि दुर्गा या तिन रुपांची पूजा नवत्रौत्सवात केली जाते. नवदुर्गा या नावानेही या देवतांना ओळख़ले जाते. ”दुःख हरण करणारी किंवा दुःख नष्ट करणारी ती….जीला दुर्गामाता”, म्हणून संबोधले जाते. प्रभुरामचंद्र जेव्हा वनवासाला गेले तेव्हा समुद्र किनार्यावर त्यांनी दुर्गामातेची नऊदिवस पुजा केली. त्या पुजेला शारदीय नवरात्र म्हणून ओळखले जाते. अधर्मावर सत्य, धर्माचा विजय प्रभुरामचंद्राने मिळविला तो दुर्गामातेची शक्ति मिळवून ! आपल्या ध्यानात येईल की शारदीय नवरात्रौत्सवाचा ऊल्लेख रामायण काळापासून आहे.
दशहरा अर्थात दसरा…. पर्वकाळातील हा अखेरचा दिवस. दहावा दिवस. आपल्या शरीरातील पांच ज्ञानेंद्रीये आणि पांच कर्मेंद्रीये मिळुन झाले दहा…! या दहांवर विजय मिळविणे म्हणजेच या दहांना हरवणे, तो दशहरा…दसरा…!
मानवी वृत्तीतील या दहा इंद्रीयांवर विजय या दिवशी मिळाला. विजय, जिंकणं, या आणि अशा आशयाच्या शब्दांचा रंग जाणकारांनी “निळा”, ”आकाशी”, निळ्या रंगाच्या जवळच्या छटा… यांचा समावेश होतो. म्हणून पहिल्या माळेला आजच्या बुधवारी सर्वसाधारणपणे निळे वस्र, साडी वगैरे पेहराव हा निळ्या रंगाचा असतो. बुधवार या वाराचा आणि बुधब्रहस्पतींचा आवडता रंग निळा आहे. म्हणून आज भाविकांनीही निळ्या रंगांचे कपडे परिधान केलेत तर त्या देवतेच्या चैतन्यापर्यंत पोहोचण्यास “बायपास” मिळतो.
या लेखात “शैलपुत्री” या दुर्गामातेच्या रुपाची माहिती घेऊ.
गिरीराजाची कन्या “शैलपुत्री”…!! दक्ष राजाच्या यज्ञात पार्वतीचा झालेला अपमान, त्यानंतर पार्वतीने हिमालयाची मुलगी म्हणून घेतलेला जन्म आणि त्यासंबंधीची कथा सर्वज्ञात आहे. अशा या शैलपुत्रीची पूजा पहिल्या माळेला केली जाते. घरात शांतता, सौख्य, लक्ष्मी चीरकाल स्थीर रहावी यासाठी शैलपुत्रीची आज निलवस्रांच्या परिधानाने प्रार्थना करतात.
— प्रा.गजानन सिताराम शेपाळ
Leave a Reply