कोथरुडचे शिल्पकार मा. शशिकांत सुतार यांचा जन्म दि. १ मार्च रोजी झाला.
भाऊ अशी ओळख असलेले मा.शशिकांत सुतार हे त्यांच्या नेतृत्वगुणांमुळे शिवसेनेचे उपनेते म्हणून कायम चर्चेत राहिले आहेत. साधेपणा हे तर भाऊंचे आभूषण, पांढऱ्या पायजमा कुर्त्यात वावरणाऱ्या भाऊ हे आदरणीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे अत्यंत जुने सहकारी होत. १९७४, १९७९ आणि १९८५ साली असे सलग तीन वेळा महानगरपालिकेचे नगरसेवक म्हणून निवडून आलेल्या शशिकांत सुतार यांनी पालिकेत शिक्षण मंडळाचे अध्यक्ष, स्थायी समिती अध्यक्ष, विरोधी पक्षनेता अशा विविध पदांवर आपल्या कार्याचा ठसा उमटवला.
१९९० मध्ये शिवाजीनगर मतदार संघातून पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले आणि १९९५ मध्ये दुसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आल्यावर मा.शशिकांत सुतार यांची युती सरकार मध्ये कृषिमंत्री पदी निवड झाली.
त्यांच्या दैदिप्यमान कारकीर्दीचा चरमोत्कर्ष म्हणजे विकास आराखड्याप्रमाणे कोथरूड चा नियोजनबद्ध विकास व वेगाने विकसित होणारे उपनगर म्हणून जगाने दखल घेतली. मा.शशीकांत सुतार यांनी केलेल्या कोथरुडच्या विकासा मुळे कोथरुडचे नाव गिनीज बुक मध्ये आले होते. केवळ कोथरूडच नाही तर पुणे शहरात त्यांनी शिवसैनिकांची फळी उभी केली होती.
कोथरूड मधील भव्य मा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची कल्पना ही भाऊंचीच होती, राष्ट्रपती ज्ञानी झैलसिंग यांच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण झाले होते. मा.शशीकांत सुतार यांचे सामाजीक, शैक्षणिक काम सुध्दा मोठे आहे. कोथरूडचे भूषण असलेल्या भाऊंनी राजा शिवराय प्रतिष्ठानच्या माध्यमातून शाळा, व न्यु इंडिया स्कुल या दोन्ही संस्था उत्तम पणे कार्यरत आहेत. त्यांनी स्थापन केलेली राजा शिवराय प्रतिष्ठान मार्फत या दोन्ही संस्थांचे ते फॉउंडर प्रेसीडंट आहेत. तसेच मातोश्री वृद्धाश्रमाच्या माध्यमातून केले जाणारे समाजकार्य, प्रत्येक ठिकाणी त्यांनी आपला ठसा उमटवला. आज ही मा.शशीकांत सुतार यांचा पुणे शहरातील राजकारणात दबदबा कायम आहे. महापालिका आणि विधानसभा अशा दोन्हींचा अनुभव असलेल्या मा. शशीकांत सुतार हे सध्या शिवसेनेचे उपनेतेपद सांभाळत आहेत. मा.सुतार यांच्याकडे संघटनात्मक बांधणीचे कौशल्य आहे, त्याचा शिवसेनेला निश्चिकत फायदा होत आहे. त्यांचे एक चिरंजीव मा.पृथ्वीराज सुतार हे सुध्दा राजकारणात सक्रिय असून पुणे महानगरपालिकेत ते शिवसेनेचे गटनेते म्हणून काम करत आहेत आहेत. त्यांचे दुसरे चिरंजीव मा.पंकज सुतार हे बॅरीस्टर आहेत. त्यांना असलेली आध्यात्मिक ओढ,अतिशय नियोजनबद्ध दिनक्रम आणि त्यांनी जोडलेले हजारो स्नेही यामुळे कोणतेही सत्तेचे पद नसताना मा.भाऊंच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आजही त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यासाठी दर वर्षी अलोट गर्दी होते. मा.शशीकांत सुतार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply