नवीन लेखन...

विख्यात उर्दू शायर निदा फाजली

दुनिया जिसे कहते है’, ‘होश वालों को खबर क्या’, ‘चुप तुम रहो, चुप हम रहें’ यासारख्या अनेक लोकप्रिय गझल लिहीणारे मुक्तिदा हसन निदा फाजली उर्फ निदा फाजला यांचा जन्म एका काश्मिरी कुटुंबात, दिल्ली येथे झाला, शिक्षण ग्वाल्हेर येथे झाले. त्यांचा जन्म १२ ऑक्टोबर १९३८ रोजी झाला. १९५८ साली त्यांनी ग्वाल्हेर कॉलेजमधून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. निदा फाजली यांचे वडीलही उर्दू शायर होते. लहान वयातच फाजली यांनी लिखाणाला सुरूवात केली. एकदा ते एका मंदिरासमोरून जात असताना एक व्यक्ती सूरदासाचे भजन म्हणताना त्यांनी ऐकले. त्या पदाच्या सौंदर्यामुळे प्रभावित झालेल्या निदा यांनी कविता लिहीण्यास सुरूवात केली. मात्र उर्दू कवितांमधे फारसा वाव नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी मीर व गालिब यांना आत्मसात केले आणि स्वत:च्या भावना नेमक्या शब्दांत मांडू लागले. नोकरीच्या शोधात १९६४ साली ते मुंबईत आले.

सुरूवातीच्या काळात त्यांनी धर्मयुग आणि ब्लीट्स मासिकांसाठीही लेखन केले. त्यांच्या लिखाणाच्या शैलीमुळे हिंदी व उर्दूतील अनेक साहित्यिक तसेच चित्रपट दिग्दर्शक प्रभावित झाले. विख्यात चित्रपट निर्माते व दिग्दर्शक कमाल अमरोही यांच्या ‘रझिया-सुलतान’ चित्रपटासाठी गीते लिहीणारे जान निसार अख्तर यांचे अकस्मात निधन झाले. त्यानंतर अमरोही यांनी फाजली यांच्याकडे विचारणा केली असता चित्रपटातील दोन गाणे लिहून दिली व अशाप्रकारे त्यांनी चित्रपट गीतांसाठी लेखन करण्यास आरंभ केला. त्यानंतर त्यांनी अनेक गीते तसेच गझल लिहील्या. प्रसिद्ध टी.व्ही. मालिका ‘सैलाब’च तसेच ‘जाने क्या बात हुई’ आणि ‘ज्योती’ यांचे शीर्षकगीतही त्यांच्याच लेखणीतून उतरले. त्यांच्या यादगार गझला आणि शायरींची यादी लांबलचक आहे. परंतु ‘कभी किसी को मुकम्मल जहां नहीं मिलता,’ ‘होशवालों को खबर क्या, बेखुदी क्या चीज है…. ’ आणि ‘तू इस तरह से मेरी जिंदगी में शामिल है’ या जीवनातील क्लिष्टता सहजसाध्या तऱ्हेने मांडणाऱ्या या गझला निदा फाजलींच्याच.

निदा फाजली यांच्या बहुतांश गझलांना जगजित सिंह यांनीच आवाज दिला. १९९४ साली त्यांनी प्रसिद्ध गजलगायक जगजित सिंग यांच्यासोबत काढलेला आल्बम ‘इनसाईट’ मधील कविता आणि संगीत खूप नावाजले गेले. मा.फाजली यांना १९९८ साली ‘साहित्य अकादमी पुरस्कारा’ने गौरवण्यात आले. तर ‘सूर’ या चित्रपटातील गीतलेखनासाठी २००३ साली त्यांनी ‘उत्कृष्ट गीतकारा’चा पुरस्कार देण्यात आला. २०१३ साली भारत सरकारने त्यांना ‘पद्मश्री’ पुरस्काराने गौरवले. मा.निदा फाजली यांचे ८ फेब्रुवारी २०१६ रोजी निधन झाले.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ:- इंटरनेट

फाजली यांची साहित्यसंपदा काव्यसंग्रह : – लफ़्ज़ों के फूल – मोर नाच – आँख और ख़्वाब के दरमियाँ – खोया हुआ सा कुछ (१९९६) – आँखों भर आकाश – सफ़र में धूप तो होगी

फाजली यांच्या लोकप्रिय गझल्स व गीते : – तेरा हिज्र मेरा नसीब है, तेरा गम मेरी हयात है ( चित्रपट – रझिया सुलतान) – आई ज़ंजीर की झन्कार, ख़ुदा ख़ैर कर (चित्रपट – रझिया सुलतान) – होशवालों को खबर क्या, बेखुदी क्या चीज है (चित्रपट – सरफ़रोश) – कभी किसी को मुक़म्मल जहाँ नहीं मिलता ( चित्रपट – आहिस्ता-आहिस्ता) – तू इस तरह से मेरी ज़िंदग़ी में शामिल है ( चित्रपट – आहिस्ता-आहिस्ता) – आ भी जा.. ( चित्रपट – सूर) – चुप तुम रहो, चुप हम रहें (चित्रपट – इस रात की सुबह नहीं) – दुनिया जिसे कहते हैं, मिट्टी का खिलौना है (गझल) – हर तरफ़ हर जगह बेशुमार आदमी (गझल) – अपना ग़म लेके कहीं और न जाया जाये (गझल) – टी.व्ही. मालिका ‘सैलाब’चे शीर्षकगीत

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..