मुळ गाणे माहित असल्यास या नविन गाण्याची मजा समजेल………
शेपटीवाल्या प्राण्यांची आधुनिक जंगलातील सभा
शेपटीवाल्या प्राण्यांची,परत भरली सभा,पोपट झाला अँडमीन,अन मधोमध उभा.
पोपट म्हणाला, पोपट म्हणाला, “मित्रांनो,देवाघरची लूट, देवाघरची लूट !
तुम्हां-आम्हां सर्वांचा “व्हाट्स अपचा ग्रुप” या ‘ ग्रुपचे ‘कराल काय ?”
गाय म्हणाली, “अश्शा, तश्या मेसेजने मी वाढवीन आशा.”
घोडा म्हणाला, “ध्यानात ठेवीन, ध्यानात ठेवीन,मीही माझ्या मेसेजने, असेच करीन, तसेच करीन,”
कुत्रा म्हणाला, “खुशीत येईन तेव्हा, स्माईली पाठवीत जाईन”
मांजर म्हणाली, …… “नाही ग बाई, कुत्र्यासारखे माझे मुळीच नाही, खूप खूप रागवीन, तेव्हा मौन धरीन मौन धरीन ”
खार म्हणाली, “मिळेल संधी तेव्हा माझ्या मेसेजची मलाच बंडी.”
माकड म्हणाले, “कधी फाँर्वड, कधी एडीट, मेसेजची मी उडवीन खिल्लीट”
मासा म्हणाला, ……… “मेसेज म्हणजे जीव की प्राण , जीव की प्राण वाचत राहीन प्रवासात, वाचत राहीन प्रवासात.”
कांगारू म्हणाले, “माझे काय ?”
“तुझे काय ? हा हा हा !
” मेसेज” म्हणजे कळतंच नाय.”
मोर म्हणाला …………. “एक एक मेसेज धरीन, धरीन ..उपदेशाचे डोस …. छान मी देईन.”
पोपट म्हणाला, “छान छान छान !
देवाच्या देणगीचा ठेवा मान. आपुल्या ‘ ग्रुपचा ‘उपयोग करा.”
“नाही तर काय होईल ?”
“दोन पायाच्या माणसांगत, आपला ग्रुप भांडत राहील.”
“जंगलातील मैत्रीचे पर्व, सोबतीला आपण सर्व “
Leave a Reply