मुळ डच कवि आद्रियान रोनाल्ड होल्स्ट यांच्या या कवितेचा मराठी अनुवाद केलाय विजय नगरकर यांनी.
शेत मजूर
(De Ploeger)
मला नको पिकातील दाणा,
रक्षण करण्या नाही
छप्पर माझ्या डोक्यावर,
माझा काय अधिकार आहे
माझी संपत्ति तुमचीच आहे ,
माझी संपत्ती फक्त एकच आहे-
तुझ्या शब्दांना मी दिशा देत आहे
प्रवासी आहे तुझ्याच आदेशाचा
नांगर चालवितो तुझ्या
शब्दांचा,
तूच मला ही जबाबदारी दिली आहे
अफाट ही भूमी व उंच पसरलेली शेती
तू विकत घेतली आहे
माझी इच्छा घोड्यासहित,
नजर जाते तेथे
पाहतो मी समुद्र,
माझे शरीर थकले आहे
दुर्बळ व शांत झाले आहे,
आता इच्छा एकाच आहे
हे शक्तिमान –
हे उपकार सहन करण्यासाठी
जन्म घेतला मी शरद ऋतूत
आणि याच जगात मरणार आहे,
तुम्ही सर्व जाणकार आहात
करून विलाप रडणे व्यर्थ आहे
माझ्या चारी दिशेला
फेर धरला आहे भूतकाळातील सुखद आठवणीने,
उदासता ही मला टाळीत आहे
आता मी या मातीत मिसळून गेलो आहे
आता मी फुलणाऱ्या कळ्यांना पाहू शकणार नाही
मी फिरून एकदा आशेचे पूल बांधू शकणार नाही
तुम्ही फक्त माझ्या पिकावर विश्वास ठेवा
मी तुमची सेवा करीत राहील
प्रारंभा पासुन अंता पर्यंत,
तुमच्या स्वार्था साठी
तुम्ही मला निवडले आहे.
या भूमीवर एक मनाने नांगर धरणारा
एक सुंदर भूमी निर्माण करण्यासाठी,
ढळत्या संध्याकाळी
लालीमेत निःसंग प्रेम
करणे गुन्हा आहे
सरळ धोपट मार्ग सोडून
ही अज्ञात उडी आहे
नम्रपणे झुकलेल्या
अग्नीत जळणाऱ्या
त्याच्या घरातील
तो एक त्याग दीप आहे
तो एक शेत मजूर आहे.
मराठी अनुवाद-विजय नगरकर, अहमदनगर,महाराष्ट्र
vpnagarkar@gmail.com
+919422726400
मुळ डच कवि –
आद्रियान रोनाल्ड होल्स्ट
आधारित-
(डच भाषा का हिन्दी अनुवाद :रामा तक्षक )
Leave a Reply