शेतकरी राजा
आहे जगाचा आधार
भुकेचा भार
त्याच्यावरी ….. १
पुण्यवान राजा
खळगी भरवी पोटाची
सार्या जगताची
एकटाच ….. २
गाळूनी घाम
त्यानं फुलवलं रानं
पिकविलं सोनं
शेतामध्ये …. ३
शेताच्या बांधाला
खातो चटणी भाकर
लागते साखर
घामामध्ये ….४
धरणीचा लेक
करी काळ्याईची सेवा
पिकवितो मेवा
जगासाठी. …. ५
करी परोपकार
ह्या सार्या जगावरी
स्वर्ग भूवरी
उतरितो ….. ६
— कवीराज – महेश पुंड
Leave a Reply