नवीन लेखन...

शेवगा एक औषधी तसेच फळभाजी वनस्पती !!!

भारतीय पारंपारिक शेती पद्धतीत बदल करून जोडव्यवसाय केल्यास शेती अधिक फायद्याची ठरू शकते. संपूर्ण जगाला शेतीचे तंत्र देणाऱ्या भारतातील शेती व्यवसाय आज संक्रमणावस्थेत आहे. कर्जाच्या डोंगराखाली शेतकरी दबल्याने ‘शेतकरी आत्महत्यांचे ‘ प्रमाण वाढलेले आहे. शेती व्यवसायात आधुनिक नवप्रयोगांचा वापर केल्यास भारतीय अर्थव्यवस्थेला बळकटी मिळेल.

दिवसेंदिवस पर्जन्याचे प्रमाण कमी होत आहे तसेच भूगर्भीय जलसाठ्याचे प्रमाणही कमी होत आहे. अशा स्थितीत शेती हा व्यवसाय जुगार बनत चालला आहे. कमी पाण्यावरही उत्पादन देणारे पिक म्हणजे शेवगा होय . कमी पाणी तसेच कमी खर्चात जास्त उत्पादन देणारे हे पिक शेतकऱ्यांना वरदान ठरू शकते.

भारतात कितीतरी वस्तू परंपरेने वापरण्यात येत आहेत, कितीतरी वनस्पतींचा वापर आहारात भाजीच्या स्वरुपात केला जातो. परंतु ह्या वनस्पतींच्या औषधी व अन्य विविध उपयोगांचा विचार करून उत्पादन केल्यास शेतकरी संपन्न होईल. तसेच रोगोपचारांच्या बाबतीत विदेशी औषधांवर विसंबून न राहता, स्वदेशी उपचाराबाबत भारताला स्वयंपूर्ण करण्यास मदत होईल.

भारतीय आयुर्वेदिक ग्रंथांमध्ये शेवग्याच्या बाबतीत विविध उल्लेख आढळतात-

” शिग्रु: सर: कटु: पके तीक्ष्णोष्मो मधुरोलधु: |
दीपन: रोचानो रुक्ष: क्षारस्तिक्तो विदाहकृत ||
संग्राह्यशुक्रलो हृध: पित्तरक्तप्रकोपण: चक्षुष्य: कफवातघ्नो, विद्रधिश्वय धुक्रिमीन ||

” चक्षुष्यं शिग्रुजं बीजं तीक्ष्णोष्णं विषनाशनम |
अवृष्यं कफवातघ्नं तन्नस्येन शिरो:र्तिहृत ||
(भावप्रकाश)
असे आयुर्वेदात उल्लेख असलेल्या या शेवगा वनस्पतीचे विविधनवे आहेत :- कुळनाव-Moringaceae,
Latin name-Moringa oleifera Linn , संस्कृत नाव-तीक्ष्णगन्धा, शोभंजन, शिग्रु, मोचक, हिंदी नाव-सहजन, सहिजन, सोहाजन, मुनगा मराठी नाव-शेवगा, मुंगणा इंग्रजी नाव- Horse radish tree , Drum stick plant अशी विविध नावे आहेत.

रासायनिक घटक- मुळाच्या सालीमध्ये ‘ मोरीजीन व मोरीजीनीन’ हे दोन अल्कोलाईडस, शेवग्याच्या फुलात ‘प्टेरोगोस्परमीन, पाल्मिकएसिड, स्टेईकएसिड, बेटेनिकअसिड, ओलेईकएसिड हे घटक असतात. मुळात टेरीगोस्पर्मीन नावाचे प्रतिजैविक असते, तसेच पानाच्या रसामध्ये जीवाणू नाशक तत्व असते. खोडातून एक भुऱ्या रंगाचा डिंक मिळतो. तसेच बियांमधून रंगरहित तेल मिळतो. तसेच मोठ्या प्रमाणात खनिजे आढळतात.

उपयोग- शेवग्यापासून जीवनसत्व ‘अ’ ‘क’ तसेच ‘ई’ तयार करतात, पाणी शुद्धीकरणात शेवग्याच्या बियांचा वापर होतो.

औषधी उपयोग- शिरोवेदना, सांधेदुखी, डोकेदुखी, नेत्रविकार, स्वरभंग, दंतरोग, अपस्मार, श्वासविकार, मंदाग्नी, पचनविकार, कृमिविकार, पोटदुखी, वायुविकार, जलोदर, वृक्काश्मरी, शरीरांतर्गत सुजन, ज्वर, कैन्सर, त्वचाविकार, श्वानदंश, अर्धांगवायू अशा विविध आजारांवरील औषधी निर्मितीमध्ये मोठ्या प्रमाणात वापर करण्यात येते.

शेवग्याच्या शेंगांचा भोजनात वापर होत असल्याने बाजारात मोठ्या प्रमाणात मागणी असते.शेवग्याच्या शेंगा बाजारात २० ते २५ रुपये दराने विकल्या जातात. शेवग्याच्या परिपक्व बिया १५० ते २०० रुपये दराने विकल्या जातात. खोडापासून निघालेले डिंक १०० ते १५० रुपये दराने विकले जाते.

अशी विविध दृष्टीने बहु उपयोगी असलेली ही वनस्पती भारतीय शेतीला जोडव्यवसाय आर्थिक विकासाला पूरक ठरू शकते.

दिवसेंदिवस पर्जन्याचे प्रमाण कमी होत आहे तसेच भूगर्भीय जलसाठ्याचे प्रमाणही कमी होत आहे. अशा स्थितीत शेती हा व्यवसाय जुगार बनत चालला आहे. कमी पाण्यावरही उत्पादन देणारे पिक म्हणजे शेवगा होय . कमी पाणी तसेच कमी खर्चात जास्त उत्पादन देणारे हे पिक शेतकऱ्यांना वरदान ठरू शकते.

” चक्षुष्यं शिग्रुजं बीजं तीक्ष्णोष्णं विषनाशनम |
अवृष्यं कफवातघ्नं तन्नस्येन शिरो:र्तिहृत ||
(भावप्रकाश)

शेवग्याच्या शेंगांचा भोजनात वापर होत असल्याने बाजारात मोठ्या प्रमाणात मागणी असते.शेवग्याच्या शेंगा बाजारात २० ते २५ रुपये दराने विकल्या जातात. शेवग्याच्या परिपक्व बिया १५० ते २०० रुपये दराने विकल्या जातात. खोडापासून निघालेले डिंक १०० ते १५० रुपये दराने विकले जाते.
अशी विविध दृष्टीने बहु उपयोगी असलेली ही वनस्पती भारतीय शेतीला जोडव्यवसाय आर्थिक विकासाला पूरक ठरू शकते. Use of the Ayurvedik medicine- Moringa oleifera Linn, or Horse radish tree.

नरेंद्र श्रावणजी लोहबरे उर्फ नरेश
About नरेंद्र श्रावणजी लोहबरे उर्फ नरेश 78 Articles
व्यवसायाने शिक्षक असलेल्या श्री नरेंद्र लोहबरे यांना विविध विषयांवर लेख तसेच कविता लिहिणे फार आवडते. देशविदेशातील प्राचीन तथा अर्वाचीन नाणे व चलनाचा संग्रह करण्याचा त्यांना छंद आहे. पर्यटन, पक्षी निरीक्षण, छायाचित्रण, रक्तदान करणे, रक्तदान शिबिरांचे आयोजन करणे आदी बाबींचेही छंद आहेत. आयुर्वेदिक वनस्पतींचे जतन करणे आवडीचा विषय आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..