भारतातील शेवग्याचे मागील वर्षी एक्स्पोर्ट झाले. शेतकऱ्यांना चांगला भाव मिळाला . म्हणून य वर्षी पुन्हा शेतकर्यांनी गुणवत्ता पूर्ण शेवगा उत्पादन घेऊन बाजारात शेंगा उपलब्ध केल्या. एक्स्पोर्ट ची मागणी तेव्हडिच आहे पण उत्पादन चार पट झल्याने बाजार कोसले. भारतीय ग्राहकाने त्याकडे पाठ फिरवली आहे. एका बाजूला कॅलशियम कमतरता वाढून गुढगे दुखी, मणके दुखी, सांधे दुखी हे आजार लोकांमध्ये फोफावत चालले आहेत. तर त्यासाठी समुद्रातील शिम्प्ल्याचे कॅलशियम दळून तयार केले जाते व त्याच्या महागड्य गोळ्या लोक खाऊन किडनी स्टोन सारख्या दुसऱ्या आजाराला बळी पडत आहेत. तर जनावरांचे कॅलशियम कमी झल्याने त्यांच्या आरोग्याच्या समस्या वाढल्या आहेत.
दुधाची गुणवत्ता ढसाळली आहे. त्यामुळे लहान मुलांचे दात किडून जतांना दिसत आहेत. आज बाजारात शेतकरी २ ते ५ रुपये किलोने शेवगा विकत आहे तरी ग्राहक नाक मुरडता आहेत. शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळाला नाही तर ते पुढे शेवग्याचे पिक घेणे थाबवतील मग हाच शेवगा इसराईल भारतात १५० ते २०० रुपये किलोने घेऊन येयील व तेव्हा तो लाईन लाऊन आपल्याला घ्यावा लागेल. महिलांनी त्यांचे सुगरणीचे गुण शेवग्याचे पदार्थ तयार करून मुलांना त्याचे सूप करून द्यावे . आठवड्यातून किमान ३ ते ४ वेळा शेवगा आहारातून घेतला गेला पाहिजे , शेवग्याची शेग भाजी, सूप, शेवग्याचे सरबत करून ते फ्रीझे मध्ये थंड करून सरबत करून द्यावे.शेवग्याची चटणी , शेवगा सूप चे पराठे, पापड, अश्या नाना गोष्टी करता येतील य साठी सामाजिक संस्थांनी पुढाकार घ्यावा. त्याचे कोणाला मार्गदर्शन लागल्यास लोक ते द्यावयास तयार आहेत. महाराष्ट्रातील जनतेने शेतकऱ्यांचा उत्साह वाढविण्यसाठी व स्वताचे कुटुंबाचे आरोग्य अबाधित ठेवण्यासाठी बाजारातील वाढीव शेवगा विकत घेऊन सहकार्य करावे. ज्या शेतकऱ्यांकडे जनावरे आहेत त्यांनी शेवगा पाला व शेंगा वळून त्याची २५० ते ५०० ग्राम भुकटी जनावरांना खाऊ घालून दुधाची प्रत उंचावून स्वतासाठी ते वापरावे व इतरांना देखील ते सांगून ५ रुपये जादा दराने विकावे.
शेत मालाला योग्य दर मिळण्यासाठी व ते टिकवण्याची जबाबदारी हि शेतकर्याची एकट्याची नाही ती आपल्या सर्वांची आहे. निसर्ग उपचारात शेवग्याचे मोठे महत्व आहे. त्यापासून गजराच्या १० पट विटामिन अ मिळते. दुधाच्या १७ पट कॅलशियम मिळते , केळीच्या १५ पट पोट्या सियम मिळते, पालकाच्य २५ पट लोह व दह्याच्या ९ पट प्रोटीन मिळते. अशी परिस्थिती असताना ग्राहकाने पायावर धोंडा पडून घेऊ नये व शेतकर्यांनी पण हे पिक वाया न घालवता जनावरांसाठी पोषक तत्व म्हणून विचार करावा.
ज्या कुणाला वरील पदार्थ बनवायचे असल्यास त्यातील तज्ञ श्री सतीश नेने कोपरगाव ७५८८२९७३५७, व ८४११८८७००८ , गरज भासल्यास मला विचारावे त्या साठी मोफत मार्ग दर्शन आम्ही ग्लोबल सोसायटी च्या वतीने मदतीस तयार आहोत.
शेंगांचा गर काढण्यासाठी त्या शिजून घेऊन त्याचा गर काढून वळवता देखील येतो. हे ओर्गानिक कॅल्सियम पचनास चांगले चालते. जास्थ पक्व शेंगा घेतल्यास त्यात जास्त कॅल्सियम मिळते. ते सावलीत वळून ठेवावे. एक्स्पोर्ट चे कारण : पाश्च्यात्य देशात जंग फूड मुळे हाडांचे विकार वयाच्या १५ पासूनच दिसत आहेत. हाडांचे झीजने कॅलशिम च्या कमतरता रोखण्यासाठी शेवगा वापर चालू झला आहे.
तरी हि माहिती जास्त लोकांपर्यंत पाठून शेतकऱ्यांचा आनंद द्विगुणीत करावा हि विनंती .
— डॉ. ज्ञानेश्वर वाघचौरे
आंतरराष्ट्रीय शेती तज्ञ
सौजन्य-अश्वमेध ग्रूप,कोपरगाव .
०२४२३ २२५५२५
Leave a Reply