शेवान – एक प्रचंड ताकद असलेला मालवणी शब्द…..
आज बागेत जात असतांना सहज कापणी झालेल्या भाताच्या शेतात लक्ष गेलं, गाडी तिथेच थांबऊन गेलो तिथे, भाताचे 4. 5 आवे वाफ्याच्या मधोमध ऊभे करून एकत्र बांधलेले…..म्हणजेच शेवान….. कापणी संपल्याची निशाणी…. कापणी संपताना किड मुंग्यांची, पाखरांची काळजी करणारा माझा गरीब शेतकरी…
मला अजूनही आठवतय, आजोबा भात शेती करायचे… 7. 8 गडी माणसे असायची कापणीला….
पण गावातील काही बलुतेदार लोकं …… नाव नाही घेत….. यायची अगदी कापणीचा शेवटचा दिवस कधी आहे त्याची चौकशी करून…. आणि हक्काने एक एक कवळी कापलेले भात … आजोबा त्यांना द्यायचे… त्यांचा हक्क म्हणून…. आता देणारे पण नाहीत…. अन् घेणारे पण नाहीत….
मी तेव्हा विचारलेले… आजोबा का देताय यांना हे धान्य ते पण न मळता?
आजही आठवतय त्यांच उत्तर..
बाऴा आपण जरी पिकवलं तरी सगळ्यांचा वाटा काढायचा… भात त्याला दिलं तरी त्याची गाय उपाशी राहील म्हणून गवतासकट…. कवळी….. देतो…
तेव्हा प्रत्तेकाची काळजी होती … पिकवणार्याला…. अगदी किडमुंगी
पशुपक्षी सगळ्यांची काळजी होती त्यांना…
आणि त्यांच्यासाठी चार आवे शिल्लक ठेवतो… तेकाच शेवान म्हणतात
बापूर्झा
डॉ बापू भोगटे
9422632456
Leave a Reply