एक अत्यंत बहुगुणी तसेच अत्यंत उपकारक. कोकणातील नारळ याला आपण कल्पवृक्ष म्हणतो अगदी त्याचप्रमाणे शेवग्याला कल्पवृक्षच म्हणावे लागेल. कारण शेवग्याचे मूळ, साल, पाने, फुले तसेच शेवग्याच्या शेंगा या सर्वच गुणकारक असतात. कारण शेवग्याचे मूळ, फुले, पाने व साल यांचा वापर युनानी आणि आयुर्वेदिक औषध पद्धतीत केला जातो. तसेच शेवगा, शेंगा, पाने, फुले यात फार मोठ्या प्रमाणावर कॅल्शियम, फॉस्फरस व व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. तसेच जीवनसत्त्व इतर भाज्यांच्या तुलनेत जास्त असते. शेवग्याची पाने आहारात वापरल्यास डोळ्यांच्या विकाराचा प्रादुर्भाव टाळता येणे शक्य आहे. शेवग्याची पाने, फुले शेंगांमध्ये वेगवेगळे औषधी गुणधर्म आणि लोहाचे प्रमाण असल्याने अनेक रोगांवर यांचा उपयोग होतो. पानाच्या रसाच्या सेवनाने लहान मुलांची हाडे बळकट होतात. रक्तप्रवाह शुद्ध होते. गरोदर महिला, बालकांनी पानाचा रस घेतल्यास त्यातील कॅल्शियम, लोह आणि जीवनसत्त्वांमुळे त्यांची व बाळाची वाढ चांगली होते. बाळंतपण सुलभ होते. या पालेभाजीमुळे बाळंतपणात भरपूर दूध येते. अस्थमा, ब्राँकायटीस आणि क्षयरोग्यासाठी पाल्याचे सूप गुणकारी असल्याचे दिसून येते. बाळाची वाढ चांगली होते. मुखरोगासाठीदेखील शेवग्याची पाने उपयुक्त ठरलेली आहेत. दात व हिरड्या कीडरहित व मजबूत ठेवण्याचा एक सोपा उपाय म्हणजे शेवग्याचा पाला धुऊन घेऊन चावत राहाणे, रस तोंडात जमा झाल्यास थुंकून टाकावा, आजही ग्रामीण भागात दंतविकारासाठी शेवग्याच्या कोवळ्या पालवीचा उपयोग करतात.
शेवग्याच्या शेंगा ही एक अतिशय उत्कृष्ट प्रकारची भाजी आहे. शेवग्याच्या आहारामध्ये उपयोग केल्यास आरोग्यास लाभदायक आहे. शेवग्याच्या कोवळ्या पानाची भाजी व फुलांची भाजी अथवा फुलांची चटणी केली जाते. शेवगा आहारात बद्धकोष्ठता, सांधेदुखी, ह्रदयरोग, रक्तदाब असे विविध प्रकारच्या आरोग्याच्या समस्यांवर रामबाण उपाय आहे. विशेष म्हणजे आहारात शेवग्याचा नियमित वापर केल्यामुळे दृष्टीदोष कमी होतो. ही फार मोठी देणगी आहे. शेवग्याचा कोवळा पालाही हिरवी भाजी म्हणून आहारात वापरावा, असे आहारशास्त्राचे महत्त्व आहे. शेवग्याच्या शेंगा व फुले हे रोजच्या आहारात विविध प्रकाराने आणता येते. शेवग्याची आमटी, शेवग्याची कढी, शेंगवणी आणि पिठले तसेच पेरू, शेंगदाणे व ओला नारळ वापरून, कांदा, लसूण फोडणी देऊन अशा अनेक प्रकारे भाज्या करता येतात. आज काल मोठ्या पंचतारांकित हॉटेल्समधून शेवग्याच्या शेंगाचे सूप हा प्रकार अस्तित्वात येऊ लागला आहे. हे सूप म्हणजे दुसरे तिसरे काही नसून शेवग्याच्या शेंग्याचाच प्रकार आहे. दाणे भरलेला शेवग्याच्या शेंगा उकडून गर काढावा व मिक्सरमध्ये साखर मीठ चवीपुरते घालून घुसळून त्यात मका किंवा तुपावर अथवा लोण्यावर भाजलेला रवा लावा. चवीसाठी त्यात लिंबू, मिरपूड, जीरेपूड घालून प्यावे. एकदम चविष्ठ व लज्जतदार आरोग्यादायी सूप पिण्याचे समाधान मिळते.
शेवगा (शेंगा + पाने) आयुर्वेदामध्ये खूपच फायदा होतो. मग ती स्त्री असो अथवा पुरुष असो. अगदी लहान मुलापासूनही हा फायदा होतो.
१. जर लहान मुलांना शेवग्याच्या शेंगाची पानाने रस काढून त्यात समप्रमाणात गायीचे अथवा म्हशीचे दूध एकत्र करून दिल्यास लहान मुलांना/ मुलींना हाडे मजबूत होऊन रक्तप्रवाह सुरळीत सुरू होतो.
२. बाळंतीण अथवा गर्भवती मातेला शेवग्यात कॅल्शियम तसेच लोह आणि इतर भरपूर जीवनसत्त्वे घातल्यास प्रसूती सुलभ होते तसेच बाळंत स्त्रीला स्तनपान करण्यास योग्य असते व मातेचा दूधपुरवठा योग्य होतो.
३. जर एखाद्या रोग्याला दम्याचा विकार होत असल्यास शेवग्याच्या रसाकरिता शेवग्याच्या पानाने रस काढून त्यात थोडे मीठ, जिरे अथवा लिंबाचा रस घातल्यास खचित आराम होतो.
४. जर एखाद्या रोग्याला घशाचा अगर छातीचा विकार असल्यास शेंगा अथवा शेवग्याची पाने असल्यास त्याचे सूप केल्यास त्वरित आराम मिळतो.
५. अपचन अथवा बद्धकोष्ठता झाल्यास तर शेवग्याच्या पानाचा रस घालून त्यात मध अथवा नारळाचे पाणी घेतल्यास पोट साफ होते.
६. ताजी शेवग्याची पाने यांचा रस काढून चेहऱ्यास लावल्यास कपाळावरील पिटुकल्या अथवा पुरळ नाहीसा होतो.
१०० ग्रॅम शेवग्याच्या शेंगा व पाने यातील काही गुणधर्म
– मदन देशपांडे
Leave a Reply