दि. ३० मेला १२वी एचएससी बोर्डाचा निकाल लागला. त्या अगोदर काही दिवस आयसीएसई बोर्डाचा निर्णय आला व त्याही अगोदर काही दिवस सीबीएसई बोर्डाचा रिझल्ट लागला. एकाच १२वीचे तिन तिन वेगळे रिझल्ट तिन वेगवेगळ्या दिवशी लागले.
‘बोर्डों के विविधता मे एकता’ ही घोषणा भारताच्या विविधतेच्या तालावर बोलण्याचे माझ्या कंठापर्यत येते पण मी ही राष्ट्रप्रेमाची उबळ मोठ्या कष्टाने आवरतो. कारण मला यात भविष्यातील फुटीची आणि विषमतेची बिजं दिसतात. एचएससी, सीबीएसई व आयसीएसई या तिनही परिक्षा एकाच देशात घेतल्या जात असल्या तरी, त्यांच्या अभ्यासक्रमात एकमेकांपेक्षा मोठा फरक आहे आणि हा फरक लहान मुलांच्या आणि त्यांच्या पालकांच्या मनात आपली शिक्षण व्यवस्था, कळत की नकळत हे कळत नाही, पण ठळकपणे बिंबवते हे नक्की. जातीववस्थेचा शाप आणि ताप कमी आहे म्हणून की काय, देशाच्या भावी नागरीकांमधे आपण नविन शैक्षणिक आणि म्हणून मानसिक जातीव्यवस्था निर्माण करतोय की काय, अशी शंका घ्यायला भरपूर जागा आहे..
पूर्ण वाचण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा..
https://www.facebook.com/nitin.salunke.1297/posts/1354803944574459
Leave a Reply