आहे मी ऋतू लयाचा
शहारता शिशिर सांगतो
हिरव्या ओल्या श्वासांना
मातीशी जोडून पांगतो…
सुस्तावल्या रात्रीस
अस्ताव्यस्त पांघरतो
आभासी धुक्याचे अस्तर
दिवसावर अंथरतो…
स्त्रोत चैतन्याचे सारे
कवेत घेत..आकसतो
भुंड्या झाडदिठ्यांना
बोचऱ्या गारव्यात डसतो
उत्पत्ती ला आहे इथे
शाप लयाचा तो कोसतो
रुक्ष देहीच्या गर्भात
बीज वसंताचे पोसतो…!!!
-सौ विदुला जोगळेकर
Leave a Reply