शिवसेनेचे नेते, ठाण्याचे माजी महापौर, माजी आमदार आणि कोळी समाजाचे नेते अनंत तरे यांचा जन्म २३ ऑक्टोबर रोजी झाला.
अनंत तरे हे शिवसेनेचे फायरब्रँड नेत्यांपैकी एक होते. ठाण्यात अनंत तरे या नावाला एक वलय होतं. एकेकाळी ठाण्याच्या राजकारणात तरे यांचा दबदबा होता. शिवसेनाप्रमुख मा.बाळासाहेब ठाकरे यांनी तरे यांचा नेहमीच सन्मान केला. अनंत तरे हे ठाण्याचे माजी महापौर होते. त्यानंतर २००० मध्ये ते विधान परिषदेवर निवडून गेले होते.त्यानंतर २००६ मध्येही ते विधान परिषदेसाठी उभे होते. मात्र, यावेळी त्यांना राष्ट्रवादीचे नेते भास्कर जाधव यांनी पराभूत केलं होतं. २००८ मध्ये त्यांची शिवसेना उपनेते म्हणून निवड करण्यात आली. २०१५ मध्ये त्यांची पालघर जिल्ह्याचे संपर्क प्रमुख म्हणून निवड करण्यात आली होती. ते कोळी समाजाचे नेते होते. शिवाय एकविरा देवी ट्रस्टचेही अध्यक्ष होते. राजकारणाबरोबरच त्यांचं सामाजिक चळवळीती योगदान मोठं होतं. त्यांच्या जाण्याने ठाणे जिल्ह्यातील राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे.
ठाण्यात सलग तीन वेळा महापौरपद भूषविण्याचा विक्रम अनंत तरे यांच्या नावावर आहे. त्यांनी १९९३ मध्ये पहिल्यांदा महापौरपद भूषविलं. त्यानंतर १९९४ आणि १९९५ सालीही महापौरपद भूषविलं होतं. ठाणे, नवी मुंबई परिसरातील अनेक कंपन्यांमध्ये त्यांनी कामगारांच्या हिताचे करार घडवून आणण्यात महत्त्वाची भूमिका निभावली होती.
अनंत तरे यांचे २१ फेब्रुवारी २०२१ रोजी निधन झाले.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply