नवीन लेखन...

शिवसेनेचे खासदार विनायक राऊत

शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांचा जन्म १५ मार्च १९५४ रोजी झाला.

साधी राहणी उच्च विचारसरणी हीच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जुन्या जाणत्या नेत्यांची विचारसरणी घेऊन मुंबई येथून जिल्ह्यात येत दोन वेळा खासदारकीची निवडणूक लढवत राणें यांच्यासारख्या बलाढ्य उमेदवारास पावणे दोन लाखांच्या मताधिक्याने धोबीपछाड दिलेले विद्यमान खासदार आणि शिवसेनेचे सचिव विनायक राऊत. विनायक राऊत यांचा शिवसेनेतील प्रमुख नेत्यांमध्ये समावेश आहे.

मुंबईतील कोणत्याही चाकरमान्याप्रमाणे त्यांची नाळ सुरुवातीपासून सिंधुदुर्गातील आपल्या गावाशी जोडली गेली होती. विनायक राऊत यांचे एम.ए. पर्यंत शिक्षण झाले आहे. राऊत मुंबई व कोकणात दीर्घकाळ सक्रिय राजकारणात प्रभावीपणे कार्यरत असल्यामुळे त्यांचा मोठा जनसंपर्क आहे. राऊत यांचे कुटुंब राजकारणात सक्रिय नाही. मुंबईत वास्तव्याला असले तरी कोकणशी नाळ जुळलेली आहे.

विनायक राऊत यांच्या पत्नी शामल राऊत आणि मुलगा गितेश राऊत हेदेखील राजकारणात सक्रिय आहेत. १९९२ मध्ये शामल राऊत मुंबई महापालिकेत नगरसेविका होत्या. त्यानंतर त्या राजकारणात फारशा सक्रिय नसल्या तरी शिवसेनेत संघटनात्मक स्तरावर त्या बऱ्यापैकी कार्यरत असतात. तर गितेश राऊत हेदेखील शिवसेनेत सक्रिय आहेत.

शिवसेनेच्या जुन्या फळीतील नेत्यांपैकी एक असणाऱ्या विनायक राऊत यांनी मुंबई महानगरपालिकेतून राजकीय कारकिर्दीला प्रारंभ केला. १९८५ मध्ये महानगरपालिकेवर नगरसेवक म्हणून निवडून गेले. १९९२ पर्यंत विनायक राऊत पालिकेत होते. १९९९ साली विनायक राऊत विलेपार्ले मतदारसंघातून काँग्रेसच्या अशोक जाधव यांचा पराभव करुन विधानसभेवर निवडून गेले. तेव्हापासून विनायक राऊत सातत्याने शिवसेनेच्या प्रमुख मंडळींमधील स्थान टिकवून आहेत.२०१४ सालच्या लोकसभा निवडणुकीत विनायक राऊत यांनी रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात काँग्रेस नेते निलेश राणे यांचा दीड लाखांच्या मताधिक्याने पराभव केला. तर २०१९ मध्ये विनायक राऊत पुन्हा लोकसभेवर निवडून गेले होते. त्यानंतर विनायक राऊत यांनी लोकसभेतील शिवसेनेच्या गटनेतेपदी निवड करण्यात आली होती.

विनायक राऊत यांचा मुंबई आणि कोकणात दांडगा जनसंपर्क आहे. गणपती, उन्हाळी सुटी व यात्रेच्या निमित्ताने विनायक राऊत आपल्या गावकऱ्यांच्या संपर्कात असतात. त्यामुळे कोकण पट्ट्यातही विनायक राऊत यांना मानणारा मोठा वर्ग आहे. कोकणात राणे कुटुंबीय आणि शिवसेना यांच्यात सातत्याने संघर्ष सुरु असतो. नारायण राणे आणि त्यांच्या दोन्ही मुलांकडून उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर सातत्याने जहरी टीका केली जाते. या टीकेला तोडीस तोड प्रत्युत्तर देणाऱ्या नेत्यांमध्ये विनायक राऊत यांचा समावेश आहे.

— संजीव वेलणकर.

९४२२३०१७३३

पुणे.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..