खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांचा जन्म ४ फेब्रुवारी १९८७ रोजी मुंबई येथे झाला.
श्रीकांत शिंदे यांनी नवी मुंबईच्या डी.वाय. पाटील महाविद्यालयातून एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण केले. ते एमएस ऑर्थोपेडीक ( MS Orthopaedic) आहेत. वडील एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी लहानपणापासूनच राजकारणाचे धडे गिरवले. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी काही काळ समाजकार्य केले. त्यानंतर २०१४ मध्ये थेट लोकसभेच्या रिंगणात उतरून त्यांनी लोकसभेत प्रवेश केला. आपल्या साडेसहा वर्षांच्या काळात श्रीकांत शिंदे यांनी अनेक संसदीय समित्यांचे सदस्य म्हणून काम पाहिले आहे.
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत कल्याण लोकसभा मतदारसंघातील डॉ. श्रीकांत शिंदे यांनी ३ लाख ४४ हजार ३४३ इतके मताधिक्य मिळवून विजय मिळवला.
गेल्या साडेसहा वर्षांच्या कार्यकाळात श्रीकांत शिंदे यांनी ठाणे लोकसभा मतदारसंघात चांगला जम बसवला आहे.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply