नवीन लेखन...

समुद्र सपाटीपासुन १३५०० फूट उंचीवरील शिवस्मारक

अरुणाचल प्रदेशात समुद्र सपाटीपासुन साडे तेरा हजार फुट उंचावर असणाऱ्या शिवस्मारक आणि छत्रपती शिवाजी मार्ग याची कथा…


अरुणाचल प्रदेशातील तवांग येथे ३ जुन २००९ रोजी राज्यपाल जे.जे.सिंग यांच्या हस्ते अश्वारुढ छत्रपती शिवाजी महाराज स्मारक उद्घाटन करण्यात आले. तसेच तवांग ते बुम्ला या २२ किमी मार्गाला छत्रपती शिवाजी मार्ग असे नावही देण्यात आले. तवांगमधल्या स्मारकातील शिवछत्रपतींची नजर चीनच्या दिशेने आहे. म्हणजेच राजे आपल्या करड्या नजरेतुन शत्रुकडे लक्ष ठेऊन आहेत.
कर्नल संभाजी पाटील निवृत्तीनंतर आपले सामाजिक जीवन एका सैनिकाप्रमाणे निष्ठेने जगत होते. २००९ मध्ये त्यांना एक फोन आला
“जय हिंद सर, दोरजी खांडु बोल रहा हुँ सर…”

कर्नल साहेब एकदम २५ वर्षं मागे गेले. त्यांना आठवला तो अरुणाचल प्रदेश आणि तिथला सकाळी सूर्याच्या किरणांनी सोनेरी होणारा हिमालय. कर्नल संभाजी पाटील हे १९८३-८४ मध्ये २२ मराठा लाईट इंफंट्री युनिटचे कमांडर म्हणुन कार्यरत होते. त्यावेळी तवांग ते बुम्ला हा रस्ता तयार करण्याची कामगिरी त्यांनी पार पडली.

हा रस्ता म्हणजे भारत-चीन सीमेकडे जाणारा एक मोठा दुवा आहे. संरक्षणदृष्ट्या या रस्त्याचे महत्त्व खुप महत्व आहे. सीमेवरील सैनिकांना जलद रसद पुरवण्यासाठी हा खास रस्ता बांधण्यात आला होता. मराठा लाईट इंफंट्रीच्या २००० जवानांनी उणे ३०℃ तापमानात काम करुन केवळ पाच महिन्यात हा बावीस किमीचा मार्ग तयार करुन दाखवला.
समुद्र सपाटी पासुन तब्बल १२४०० फुट उंचीवर असणारा अरुणाचल प्रदेशातील हा अतिशय दुर्गम असा भाग. अशा भागात काम करणे खुपच अवघड. रस्ता बांधण्यासाठी स्थानिक लोकांची मदत घेणे खुपच आवश्यक होते. या सगळ्या कामात कर्नल संभाजी पाटलांची ओळख दोरजी खांडु या तवांग भागातील एका उत्साही युवा नेतृत्वासोबत झाली. पुढे त्यांच्यात चांगली मैत्री झाली.

दोरजी खांडु नित्यनेमाने मराठा लाईट इंफंट्री युनिटला भेट देत असत व युनिटला काही मदत लागल्यास ती गावातील लोकांच्या मदतीने करत असत. या काळातच त्यांना मराठा लाईट इंफंट्रीच्या बेळगाव येथील मुख्यालयात खास प्रशिक्षणासाठी सुद्धा पाठवण्यात आले होते. दोरजी खांडु व मराठा लाईट इंफंट्रीच्या सर्व जवानांमध्ये एक खुप चांगले नाते निर्माण झाले होते. हेच खांडु नंतर अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री बनले.

p-45102-shivaji-memorial-at-13500-feet-above-seal-level-in-arunachal-pradeshमराठा लाईट इंफंट्री युनिटने बांधलेला हा २२ किलोमीटरचा रस्ता म्हणजे तवांग भागातील अरुणाचली बांधव आणि २२ मराठा लाईट इंफंट्रीच्या सर्व जवानांचे देशासाठी दिलेले खुप मोठे योगदान होते. हा रस्ता केवळ कर्नल संभाजी पाटील व दोरजी खांडु यांच्या मैत्रीचेच प्रतिक नाही, तर पश्चिमेकडील मराठी आणि अतिपुर्वेकडील अरुणाचली नागरिकांच्या मैत्रीचेही ते प्रतिक आहे.

दोरजी खांडु यांनी या रस्त्याचे काम पुर्ण झाल्यानंतर स्थानिक अरुणाचली बांधवांच्या वतीने २२ मराठा लाईट इंफंट्रीच्या सर्व जवानांसाठी एका मेजवानीचे आयोजन केले होते. इंफंट्रीच्या सर्व जवानांचा त्यात गौरव करण्यात आला. त्यावेळी त्यांनी काही रोख रक्कम बक्षीस म्हणुन २२ मराठा लाईट इंफंट्री युनिटसाठी देऊ केली. परंतु इंफंट्रीच्या सर्व जवानांनी ती रक्कम साभार परत केली आणि अरुणाचली बांधवांना विनंती केली की “हा रस्ता महाराष्ट्र-अरुणाचल मधील बांधवांच्या मैत्रीचे प्रतीक आहे. या रस्त्याला तमाम महाराष्ट्राचे दैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्यात यावे. तसेच या रस्त्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची दोन स्मारके उभी करावीत. त्यातले एक तवांग युद्ध स्मारकाजवळ व दुसरे या रस्त्यातील एखाद्या महत्वाच्या ठिकाणी असावे.”

दोरजी खांडु आणि स्थानिक अरुणाचली बांधवांनी कसलाही वेळ न लावता तात्काळ ही मागणी मान्य केली. मराठा लाईट इंफंट्रीने निर्माण केलेला तवांग-बुम्ला रस्ता आज छत्रपती शिवाजी मार्ग या नावाने ओळखला जातो. पुढे दोन महिन्यातच अरुणाचल बांधवांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे एक अर्धाकृती स्मारक तवांग-बुम्ला रस्त्यावरील एका महत्वाच्या जागी उभे केले. तसेच तवांग येथे छत्रपती शिवरायांचा अश्वारुढ पुतळा ही उभा केला.

शिवछत्रपतींच्या शिल्पाच्या अर्पण समारंभात २२ मराठा लाईट इंफंट्रीच्या सर्व जवानांसोबत दोरजी खांडु यांना मराठा लाईट इंफंट्रीचे स्फुर्तीगीत खड्या आवाजात गाताना बघुन अनेकजणांना आश्चर्य वाटले.

मर्द आम्ही मराठे खरे, शत्रुला भरे कापरे ।
देश रक्षाया, धर्म ताराया,
कोण झुंजीत मागे सरे ।। धृ ।।

वादळापरी आम्ही पुढेच चालतो, जय शिवाजी गर्जुनी रणांत झुंजतो ।
मराठा कधी न संगरातुनी हटे, मारुनी दहास एक मराठा कटे ।
सिंधु ओलांडुनी, धावतो संगिनी, पाय आता न मागे सरे ।।१।।

व्हा पुढे अम्हा धनाजी, बाजी सांगती, वीर हो उठा कडाडतात नौबती ।
विजय घोष दुमदुमे पुन्हा दिगंतरी, पुर्वजापरी आम्ही अजिंक्य संगरी ।
घेऊ शत्रुवरी झेप वाघापरी, मृत्यु अम्हा पुढे घाबरे ।।२।।

भारता आम्ही तुलाच देव मानतो,
हाच महाराष्ट्र धर्म एक जाणतो ।
राखतो महान आमची परंपरा, रक्त शिंपुनी पवित्र ठेवती धरा ।
ह्याच मातीवरी प्राण गेला तरी, अमुची वीर गाथा उरे ।।३।।

बोला श्री छत्रपती शिवाजी महाराज की …जय !

अशा विजयाच्या घोषणांनी तवांग-बुम्ला परिसराचा आसमंत दुमदुमुन गेला.

संदर्भ..
The Governor of Arunachal Pradesh

(Press Release : Governor)

— सीए संजीव ब्रह्मे यांच्या फेसबुक वॉलवरुन 

Avatar
About Guest Author 525 Articles
मराठीसृष्टीवर ज्या लेखकांनी स्वत:चे अकाऊंट बनवले नाही त्यांचे लेख या Guest Author द्वारे प्रकाशित होतात. आपले सर्व लेख एकत्रितपणे मिळवण्यासाठी स्वत:चे अकाउंट मराठीसृष्टीवर जरुर बनवा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..