नवीन लेखन...

शिवांबु घेण्यास सुरूवात कशी करावी?

शिवांबु बद्दल आपल्या  मनात पूर्व संस्कारामुळे घ्रूणा, शिसारी असते. त्यामुळे इच्छा असूनही मनाची तयारी होत नाही. त्यामुळे शिवाबु उपचार चटकन स्विकारला जात नाही. आजाराच्या तीव्रतेने मनाचा निश्चय झाला तरी शिवांबुने भरलेला ग्लास तोंडाशी नेल्यावर सुध्दा ते पिण्यापासून पराव्रुत्त होण्याचा संभव असतो. एक गोष्ट आपण लक्षातघेणे गरजेचे आहे ते म्हणजे शिवाम्बु हे रक्तापासून तयार होते. ते टाकाऊ नाही.  ह्यासाठी  पुढील  प्रमाणे सुरुवात करावी.

एका ग्लासात(अंदाजे२००मि.ली.) प्रथम एक चमचा  शिवांबु घाला. नंतर ग्लास पाण्याने भरा. आता ह्यात जवळ जवळ सर्व पाणीच आहे. कारण शिवांबूत ९५% पाणीच असते. आता ह्या पाण्याची चूळ भरा. चूळ भरल्याने पाण्याची चव कळेल ती पाण्यासारखीच लागेल. मग ग्लासातील उरलेले पाणी औषध म्हणून प्या.

पुढील वेळेस २ चमचे शिवांबु घेऊन पाणी घालून प्या. हे दोन चमचे शिवांबु घातलेले पाणी घेणे सोपे असते कारण पहिल्या वेळी एक चमचा शिवांबु पोटात गेलेले असते. त्यामुळे मनाची तयारी झालेली असते.

पुढील प्रत्येक वेळी शिवांबुचे  प्रमाण थोडे थोडे वाढवत जावे.

निम्मा ग्लास शिवांबु व निम्मे पाणी घेऊ  लागले की हे प्रमाण पुढे एक महिना तसेच ठेवावे.

नंतर नुसते शिवांबु घ्यावे.

निम्मे पाणी व निम्मे शिवाम्बु घ्ययला सुरूवात केली की लगेचच शरीर शुद्धीला सुरूवात होते.

बीपी व शुगर असणार्याना सुरूवात करताना नुसते शिवांबु घेतले तर बीपी शुगर प्रथम वाढण्याची शक्यता असते अर्थात हे फार दिवस टिकत नाही आणि प्रत्येकाचे वाढतही नाही तसेच काही दिवसांनंतर कमीही होते. पण आजार वाढला की घाबरायला  होते. म्हणून पहिला महिना तरी निम्मे पाणी घालून घ्यावे. निम्मे पाणी घातले तरीही तब्बेतीत चांगला फरक जाणवतो.

अरविंद जोशी 
९४२१९४८८९४

आरोग्यदूत WhatsApp ग्रुपवरुन

Avatar
About अरविंद जोशी 41 Articles
अरविंद जोशी हे naturopathy & pranik healing चे गाढे अभ्यासक आहेत. त्यांचा फुलांवरही खूप अभ्यास आहे. ४० वर्षाचा त्यांचा अनुभव आहे. आज वयाची ७० वर्षें असुनही मुद्दाम what's app शिकून घेतले आहे. सेवाभाव म्हणून ते WhatsApp ग्रुपसाठी काम करतात.

1 Comment on शिवांबु घेण्यास सुरूवात कशी करावी?

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..