मानवी जीवनात राग,लोभ,मोह या क्षणी तीव्र भावना उद्दीपित होतात. मनातील भावना सहजरित्या प्रवाही मातृभाषेत प्रकट होतात. मातृभाषेतील शब्द रचना,संवाद,लालित्य व शब्दबद्ध साज सज्जा चकित करणारा असतो.
दिल्ली विद्यापीठातील प्रख्यात भाषा विद्वान, लेखक डॉ भोलानाथ तिवारी यांनी पीएचडी प्रबंधा करीता रशियातील कजागिस्तान व उझबेकिस्तान येथील स्थानिक हिंदी बोली वर अभ्यास करण्या साठी दौरा केला. तेथील जैन,सिख,उत्तर भारतीय लोकांच्या संपर्कामुळे विशिष्ठ हिंदी बोली प्रचलित झाली आहे.
तेथे एका गांवी त्यांना दोन महिला भांडण करताना दिसल्या. ते तेथे थांबले.रशियन दुभाषी त्यांना म्हणाला ‘ आपण येथून निघू या, लोक आपल्याकडे पाहत आहेत’
डॉ भोलानाथ तिवारी तेथेच हटून थांबले. त्या भांडणात एका शिवी मुळे दुसरी महिला ढसा ढसा रडली.
डॉ भोलानाथ तिवारी यांनी दुभाषी मित्राला विचारले-
‘ ही कोणती जहरी हृदयाला लागणारी शिवी आहे ज्यामुळे ती महिला तत्काळ रडू लागली ? मी आता पर्यंत भारतातील अनेक प्रांतातील शिव्यांचा अभ्यास केला आहे,परंतु या शिवीत अफाट शक्ती आहे, आमच्या भारतीय महिला एका शिवीत हार मानत नाही ‘
तेव्हा दुभाषी मित्र म्हणाला-
‘ नको, ती शिवी आम्ही ऐकत सुद्धा नाही, खूप विषारी शाप आहे’
तुम्ही भाषा अभ्यासक आहात,या करिता सांगतो की या शिवीचा येथील स्थानिक भाषेतील अर्थ आहे-
तुझा मुलगा मोठा झाला की तू शिकवलेली भाषा विसरून जावो ‘
ज्या आईने मातृभाषा शिकवली तीच जर आपण विसरून गेलो की आपला परिवार,समाज, विद्या व देशाशी संबंध तुटतो. मातृभाषा विसरणे या सारखा दुसरा मोठा कोणताही शाप या देशात नाही.
विजय नगरकर
अहमदनगर, महाराष्ट्र
Leave a Reply