दादरा, नगर हवेली, वापी या भागात मी फिरलो आहे. चर्चगेट पासून ते वापी पर्यंत महाराष्ट्र गिळला गेला आहे. उंबरगाव महाराष्ट्रात सामील करण्याचा लढा संपला…. इतिहास जमा झाला.
बेळगाव, कारवार, निपाणीचे लोक महाराष्ट्रात येण्यासाठी महाराष्ट्राच्या दरवाजावर अनेक वर्षे टक्कर देत आहेत. त्यांचा कपाळमोक्ष झाला. कानडी पोलिसांच्या लाठ्या काठ्या खावून त्यांची हाडे पीचली आहेत पण अजूनही ते लढत आहेत. भविष्य अंधक्कारमय झाले आहे.
मुंबई कोणत्या जोरावर म्हणायची मराठी माणसाची ? कर्जत-कसा-याला गेलेला मराठी माणूस मुंबईत ये जा करतोय म्हणून कुठेतरी मराठी शब्द कानावर पडत आहेत. सर्व ठेकेदार, कंत्राटदार अमराठी, स्थानीय लोकाधिकार समिती सुस्त आहे.
विदर्भात महाराष्ट्र अस्मिता कधीच संपलीय. नाही नाही म्हणता विदर्भ चाललाच आहे हातातून ….
आम्ही मात्र बाजीराव मस्तानीचा नाच पाहत फुशारक्या मारतोय. एकेकाळी मराठी माणसाच्या तलवारीच्या धाकानी हिंदुस्थान ढवळून निघाला होता ना …….. त्याच इतिहासात रमलोय !!!
बोला जय भवानी जय शिवाजी ……!!!!
आवाज फाटे पर्यंत घोषणा द्या !!! तेव्हडेच समाधान ……
— चिंतामणी कारखानीस
नमस्कार.
छान लेख. पोटतिडीक जाणवते.
पण, इथें ( एकनाथांच्या शब्दांत सांगायचें तर) ‘दोन आंधळे रे एका दिसेचिना !’
तरीही आपण ‘अरण्यरुदन’ करत रहायचें, इतकेंच !
स्नेहादरपूर्वक
सुभाष नाईक