नवीन लेखन...

शिवराय हे निधर्मी राज्यकर्ते होते !

॥ राजे शिवछत्रपती ॥
॥ जय भवानी जय शिवाजी ॥

“शिवराय हे निधर्मी राज्यकर्ते होते….!”

छत्रपती शिवाजी महाराज व अफजलखान यांची प्रतापगडावर भेट ठरली. याप्रमाणे छत्रपती शिवराय व त्यांचे दहा अंगरक्षक प्रतापगडावर पोहचले.अफजलखान अगोदरच शामियान्यात आला होता. शिवराय व त्यांचे वकील शामियान्यात गेले. अफजलखानाने शिवरायांचे स्वागत केले. आणि आलिंगन दिले. अफजलखानाने शिवरायांची मान काखेत दाबण्याचा प्रयत्न केला आणि शिवरायांच्या पाठीत बिचवा खुपसला. पण चिलखत असल्यामुळे शिवराय बचावले. तेवढ्यात शिवरायांनी खानाच्या पोटात वाघनखे खुपसली.

त्याच अवस्थेत अफजलखान लव्हा…लव्हा ( वाचवा वाचवा ) म्हणत पळत सुटला. बाहेर लोहार समाजाचे संभाजी कावजी उभे होते. त्यांनी “अफजलखानाला कापला…”.शामियान्यात सन्नाटा पसरला. सय्यद बंडा शिवरायांवर वार करणार तेवढ्यात, जिवाजी महाले या नाभिक समाजाच्या सैनिकाने, सय्यद बंडाचा हात वरच्यावर उडवला..! खरचं होता जिवा…म्हणून वाचला शिवा ! शामियान्याबाहेर “सिद्धी इब्राहीम” हा “शिवरायांचा मावळा” शत्रूशी एकाकी झुंज देत होता. शिवरायांनी अफजलखानाला मारल्यानंतर काम संपले होते..विजय जवळ होता पण अचानक एक घटना घडली.

अफजलखानाचा वकील कृष्णा भास्कर कुलकर्णीने शिवाजी महाराजांच्या कपाळावर तलवारीचा वार केला. घळा घळा रक्त वाहू लागले..जिरेटोप असल्यामुळे शिवराय बचावले. ( जर जिरेटोप नसता तर त्याचवेळी स्वराज्याची प्राणज्योत मावळली असती ) ( शिवरायांच्या आयुष्यात त्यांच्या शरीरावर जखम करणारा कृष्णा भास्कर कुलकर्णी हा एकमेव होता…एकमेव !) त्याच अवस्थेत शिवरायांनी कुलकर्णीची तलवार हिसकावून घेतली आणि महाराजांनी त्याला कापला. अफजल खानाचा कोथळा बाहेर काढल्या नंतर महाराजांची योजना होती की लगेच गडाच्या दरवाज्या कडे धाव घ्यायची.. प्रतापगडाच्या दरवाज्याकडे पळत सुटले..जाता जाता महाराज सोबतचे अंगरक्षक मोजु लागले…
१,
२,
३,
४,
५,
६,
७,
८,

फक्त ९ ? सोबत तर दहा होते…मग कोण बाकी राहिलं..? राजांनी विचारलं…कोणी तरी म्हटलं,’संभाजी कावजी नाही जी’ राजे म्हणाले, ‘नाही? काय झालं? मधुनच कुठे गेला?’

तेवढ्यात संभाजी कावजी धापा टाकत आला. राजे संतापले आणि म्हणाले, ‘संभाजी कुठे होतास?’ संभाजी कावजी म्हणाला, ‘राजं.. तुम्ही वाघनख मारली खानाला पण म्हटलं…मरत्यो की न्हाई म्हणुन मागे गेलो आणि त्याचं शीर कापुन आनलं’ आणि त्यानी कापुन आनलेलं खानाचं डोकं वर केलं… राजांना दाखवायला.. राजे म्हणाले, ‘अरे गड्या त्या वाघनखांना विष लावलं होतं. खान कसाही करुन मरणारच होता मग तू हे वेडं धाडस का केलं..यापुढे लक्षात ठेव जे आपल्या योजनेत नाही ते कधीही करायचं नाही..

एक वेळेस खान मेला नसता तरी चाललं असतं पण जर तुझ्या जिवाला काही बर वाईट झालं असतं तर.. तुमच्या मतोश्रींना काय तोंडदाखवलं असतं मी…ती तर हेच म्हटली असती ना की “शिवाजी ने स्वत:चा जीव वाचवण्यासाठी माझ्या पोराचा जीव घालवला..” तुझ्या जागेवर एक वेळेस मी मेलो असतो तर चाललं असतं पण स्वराज्याचा एकही मावळा मरताकामा नये.’

जगाच्या पाठीवर पहिला राजा आहे…!
जो आपल्या एका साध्या अंगरक्षासाठी सुद्धा मरायला तयार आहे. आपल्या प्रजेवर लेकरांसारखं प्रेम केलं आहे ह्या राजांनी…संभाजी कावजी आणि हिरोजी फर्जद यांनी, अफजलखानाचे मुंडके रायगडावर जिजाऊ यांना दाखवायला आणले. शत्रू अफजलखान मेला याची जिजाऊ यांना खात्री झाली. जिजाऊनी सैनिकांना अफजलखानाच्या प्रेताचे दफन प्रतापगडाच्या पायथ्याशी करण्याचे आदेश दिले आणि जोपर्यत या स्वराज्याचे नाव राहील तोपर्यंत, अफजलखानाच्या थडग्याचे “इस्लाम धर्माप्रमाणे” संस्कार करण्याची आदेश दिले.

अफजलखानाच्या वधानंतर त्याच्या कुटुंबाची काळजी स्वतः शिवरायांनी घेतली आणि राजगडावर व प्रतापगडावर अफजलखानाची कबर स्वराज्याच्या खर्चाने बांधली. शिवरायांचा लढा हा धार्मिक नव्हता. मानवतावादी होता. म्हणूनच अफजलखानाच्या पोटात शिवरायांनी जी वाघनखे खुपसली होती, ती वाघनखे “रुस्तुम ए जान” या “मुस्लीम सैनिकाने” बनवली होती. रायगडावर शिवरायांनी मुस्लीम बांधवासाठी मस्जिद बांधली होती.”शिवराय हे निधर्मी राज्यकर्ते होते….!” हि वस्तुस्थिती मानावीच लागेल…मानावीच लागेल !”

“जय भवानी, जय शहाजीराजे, जय जिजाऊ,
जय शिवराय, जय शंभूराजे”
“शिवसंस्कृती..आपली संस्कृती..आपला अभिमान..!

अभिमानाने सांगावस वाटत आहे, या पोस्टला मुस्लिम बांधवांनी देखील मोठ्या दिमाखात लाईक अन शेयर केले आहे मग आपण माग राहून कसं चालेल…! हिच खरी आहे ताकद या माझ्या राजांची.. सांगाव नाही लागत.!

— गणेश उर्फ अभिजित

Avatar
About गणेश कदम 48 Articles
पुणे येथे वास्तव्य असलेले गणेश कदम हे विविध विषयांवर समाजमाध्यमांतून लिहित असतात. ते टेक महिंद्र या कंपनीत वरिष्ठ सल्लागार आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..