वे’रुळ व एलोरा किंवा अजिंठा या जगप्रसिद्ध लेण्यांची निर्मिती जरी इ. स. १ ते इ. स. १४ च्या दरम्यान झाली असली तरी त्या आपल्याला आता आता म्हणजे ब्रिटिशांचं राज्य हिंदुस्थानवर होतं त्या काळात जगाला वेरुळ कळाल्या. डोंगररांगांमध्ये ही निर्मिती झाली. जळगावजवळ अजिंठा तीन डोंगरांमध्ये अजिंठा लेण्यांत चित्रकला साकारली. या व अशा प्रकारच्या लेण्या या महान राष्ट्रात… ‘महाराष्ट्रात’ सुमारे एक हजारांवर आहेत.
केवळ महाराष्ट्रातच अशा प्रकारच्या लेणी स्थापत्यांची निर्मिती होण्याचं काम का घडलं? याचं उत्तर उघड आहे की, ‘कार्विन म्हणजे कोरीव काम करण्यास असलेला पोषक असलेला दगड-खडक हा महाराष्ट्रात मुबलक आहे. ‘बेसॉल्ट’ जातीचा दगड- तज्ज्ञांच्या मते महाराष्ट्रात अधिक आहे आणि म्हणूनच महाराष्ट्रात लेणी-स्थापत्ये अधिक निर्माण झाली. अजूनही अनेक डोंगरांमध्ये अशा प्रकारची लेणी सापडत आहेत. अगदी
दोन-तीन वर्षांपूर्वी पुणे-मुंबई डोंगरात चित्र रस्त्यावरील कामशेतजवळच्या चित्रशैली’ प्रमाणे ‘अजिंठा रंगविलेली एक-दोन लेणी सापडली. त्यातील चित्रे अर्धवट रंगविली आहेत, पण सांगायचं तात्पर्य एवढंच की, ही लेणी महाराष्ट्रातील अनेक डोंगरांमध्ये आजही सापडत आहेत.
ज्येष्ठ इतिहासकार डॉ. निनाद बेडेकर यांनी सांगितलं की, वेरुळच्या दगडावर ‘धुमाळ’ एका लेणीच्या नावाच्या एका महाराष्ट्रीय माणसाचं नाव एका फलकाच्या आकारात कोरलेलं सापडलं. म्हणजे ही जगप्रसिद्ध लेणी एका महाराष्ट्रीयन व्यक्तीच्या कल्पनेतून साकारली असं जेव्हा बेडेकरांनी सांगितलं तेव्हा माझ्या मनात जी बेचैनी; अनेक विचारांचं काहूर सुरू होतं त्याला पूर्णविराम मिळाला आणि माझ्या मनातील विचारांना नवीन . चालना आणि गती मिळाली, त्यातूनच…
१९९५-९६ च्या सुरुवातीस, ‘मृत्युंजय’कार शिवाजी सावंत यांच्याशी प्रथमच मनातील एक विचार भीत-भीतच बोललो. कारण हा विचार समोरच्याने ऐकल्यानंतर त्याने ‘मला’ वेडा न म्हटले तरच नवल…!! असा ‘तो विचार’ त्यावेळी मला वाटत होता… म्हणून प्रकट करायला मी घाबरत होतो.
सुमारे २००० वर्षांनंतर संपूर्ण जगात जे आश्चर्य घडलं नाही ते आश्चर्य आपल्याकडे घडू महाराष्ट्रात घडू शकेल ‘छत्रपती शिवाजी महाराज लेणीस्थापत्याच्या’ रूपानं..!!
‘मृत्युंजय’ कार… अवाक् झाले. ‘हा विचार धाडसी असेलही, परंतु हा विचार साकारण्यात अशक्य काहीही नाही.’ मी त्यांना म्हणालो. अर्थातच ‘कसं शक्य आहे?’ हा प्रश्न त्यांनी विचारलाच.
म्हटलं, महाराष्ट्रात प्रत्यक्ष दगडावर काम करणारे तसा अनुभव पाठीशी ‘असणारे अनेक शिल्पकार आहेत. त्यापैकी किमान ५०-५५ शिल्पकार आणि सुमारे हजारावर ‘कातकरी’ यांना एकत्र करून अगदी अल्पकाळात हा ‘लेणी स्थापत्य प्रकार’ निर्माण होऊ शकतो.
याबाबत त्यांची खात्री झाल्यावर बऱ्याच बैठका झाल्या. त्यातून ‘छत्रपती शिवाजी महाराजांच्या’ जीवनावरील सुमारे १७० ते २०० प्रसंग त्यांनी सुचवले की, ज्या प्रसंगांवर उत्तम कार्विन होऊ शकते आणि जे प्रसंग पाहिल्यावर महाराजांच्या अंगी असलेल्या गुणांचं आणि कौशल्यांचं दर्शन होऊन, पाहणारा थक्क तर होईलच, परंतु ते दृश्य पाहून पाहणारा काहीतरी ‘आदर्शवत’ शिकेल. १९९५-९६ मध्ये या लेणी स्थापत्यामध्ये कोणते प्रसंग असावेत. ‘मृत्युंजय’ कारांनी याबाबत मार्गदर्शन यावर केले.
खडकांमध्ये पाण्याचे प्रवाह असतात. जेथून पाण्याचे प्रवाह जातात तेथील खडकांची जागा मोकळी होते व बाजूचे खडक हे अधिक कठीण होतात. जसे ब्रेडच्या स्लाईसला मध्येच कुठेतरी बोटांनी दाबले तर त्या ठिकाणी ब्रेडचा ‘स्पॉजी’ भाग ‘स्पॉजी’ न राहता दाट बनतो. अगदी तसंच डोंगरांच्या, आत * खडकांत असंच होतं. मग त्या ठिकाणी कार्विन करणं कठीण जातं आणि याच अशाच कारणांमुळे बऱ्याच ठिकाणच्या लेण्या या अपूर्ण राहिल्या असाव्यात.
या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी अनेक क्षेत्रांतील व्यक्ती तयार आहेत व होतील. कारागीर व इतर काम करणाऱ्या व्यक्तींना दुखापत काही वैद्यकीय धर्मादाय सेवा आजारपण, झाल्यास संस्थांनी देण्याची तयारी दर्शविली आहे. विमा कंपन्यांचीही मदत मिळू शकते. पंढरपूरवारीला अन्नदान करणाऱ्या अनेक दानशूरांकडून या प्रकल्पात काम करणाऱ्या कारागिरांसाठी व इतर काम करणाऱ्यांसाठी अन्नदान किंवा अल्पदरात चहा, नाश्ता जेवण, पुरविण्याची तयारी आहे. थोडक्यात, एवढ्या मोठ्या शिवधनुष्यास पेलण्यासाठी अनेक हातांनी आधार देण्याचं दृश्य आहे. जर हा विचार प्रत्यक्षात आला तर आणखी प्रखर आणि प्रबळ हात पुढे येतील यात संदेह नाही.
सुमारे ३० लेण्यांमध्य-गुंफांमध्ये शिवचरित्रावर आधारित कमीत कमी ६०० ते ८०० दृश्य शिल्पांकित केली आणि साधारण १५’ x १२’ किंवा १५’ x २०’ किंवा १५’ x १०’ अशा दृश्य चौकोनात एकेक दृश्य शिल्पांकित करायचे ठरविले तर सुमारे १६०००० स्क्वेअर फूट क्षेत्रात (अंदाजे १६० गुंठे किंवा सुमारे ४० एकर डोंगरकुशीत) हे शिल्पांकन होऊ शकते.
या लेण्यांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे बालपण व किशोर वय हा पहिला कालखंड, दुसऱ्या कालखंडात त्यांची गनिमी काव्याची कारकीर्द-युद्धप्रसंग-गड किल्ले – त्यांच्या सरदार-सैनिकांची दैनंदिनी इत्यादी आणि तिसऱ्या कालखंडात त्यांचा राज्य कारभार व तत्संबंधीची दृश्ये अशी सर्वसाधारण विभागणी केली तर संपूर्ण शिवचरित्र हे शिवसचित्र-चरित्र बनेल आणि छत्रपती शिव शिल्प संग्राम’ लेणी स्थापत्य बघताना प्रत्येक मराठी माणसाची मान उंचावेल.
या प्रत्येक दृश्यांच्या खाली त्या दृश्यांची माहिती देणारी संस्कृत आणि मराठी भाषेतील आशयगर्भ घोषवाक्ये किंवा सुभाषिते ‘त्या’ ‘त्या’ शिल्पांच्या सौंदर्यात भरच टाकतील.
पुरातत्त्ववेत्त्यांच्या म्हणण्यानुसार एका दगडाचं आयुष्य हे लाखो वर्षाचं असतं.
युगातील आजही अनेक पुरावे पुराणाश्म संग्रहालयात अभ्यासायला आहेत. त्यांचं आयुष्य काही लक्ष वर्षे आहे-असतं, असं तज्ज्ञ सांगतात. म्हणजेच जर ‘छत्रपती शिवाजी महाराज लेणी स्थापत्य प्रकल्प पूर्ण झाला तर…
जोपर्यंत चंद्र-सूर्य आहेत… जोपर्यत पृथ्वी आहे आणि जोपर्यंत मानवजात आहे… तोपर्यंत ‘छत्रपती शिवाजी महाराज लेणी स्थापत्य’ चिरंजीव राहील. हे जागतिक हिंदुस्थानी आकर्षणाचा विषय ठरेल आश्चर्य आश्चर्य बनेल, पर्यटन जगभरात आणि निधी आपल्या महाराष्ट्राला मिळविण्याचं एक नवीन दालन उघडे होईल.
– प्रा. गजानन सिताराम शेपाळ
ऑगस्ट २००८ मध्ये लिहिलेला हा लेख पुनर्प्रकाशित
Leave a Reply