श्लेषालंकार चारोळी
(१)
पारावरच्या गप्पांना झळाळी चढली
आयुष्याची संध्याकाळ झाली
जिवननौका पार होण्या आली
जगण्यातली झळाळी गेली
(२)
नावात काय आहे
नाव कमवून रहा
तरच जिवन नाव
पैलतीरी जाई पहा
(३)
हळदी-कुंकवाची आहे चाल
तेव्हा उखाणा घेती छान
उखाण्याला लावा चाल
पतीराजांना द्यावा मान
(४)
अपयशाने खचतोस का?
हार तरी का मानतोस
प्रयत्नांना साथ देतोस का ?
यशाच्या सन्मानार्थ हा हार घेतोस
(५)
तुझ्यासाठी जीव झाला खुळा
तुझ्यावरी जीव माझा जडला
जीवात जीव आहे तोवर
माझाजीव तुझ्यात गुंतला
सौ.माणिक शुरजोशी
नाशिक
Leave a Reply