नवीन लेखन...

नावाप्रमाणेच समर्थ अभिनेत्री शोभना समर्थ

शोभना समर्थ यांचे वडील बँकचे संचालक होते. हिंदी चित्रपटसृष्टी गाजवणाऱ्या नूतन व तनुजा यांची मातोश्री व काजोल, मोहनीश बहेलची आजी. त्यांचा जन्म १७ डिसेंबर १९१६ रोजी झाला. वडिलांच्या मृत्यूनंतर मामा जयवंत (नलिनी जयवंतचे वडील) यांच्याकडे त्यांचे संगोपन झाले. मामाच्या कडक अनुशासनात राहूनही त्या चोरून चित्रपट बघायची व सिनेतारकां होण्याचे स्वप्न बाळगायच्या.

वयाच्या १८ व्या १९३४ साली केवळ ५०० रुपये पगारावर ‘निगाह-ए-नफरत’ या मास्टर विनायक निर्मित चित्रपटात त्यानी काम केले. हाच चित्रपट १९३५ साली मराठीत ‘विलासी ईश्वर’ म्हणून निघाला. त्या तारका बनल्या. शोभना समर्थ यांचे माहेरचे नाव सरोज शिलोत्री. जर्मनीहून सिनेमेटोग्राफीचे प्रशिक्षण घेऊन आलेले कुमार सेन समर्थ यांच्यासोबत त्याचा विवाह झाला. सरोज शिलोत्रीची ‘शोभना समर्थ’ झाल्या. त्या काळातील मातब्बर कलाकार मोतीलाल बरोबर सौंदर्य खणी शोभना समर्थ यांची जोडी खूप गाजली.

‘दो खरब जन’, ‘दो दीवाने’ (१९३६), ‘कोकिला’ (१९३७) हे त्यांचे चित्रपट. त्या काळातील धार्मिक चित्रपटातील प्रसिद्ध कलाकार प्रेम अदीब बरोबरही त्यांची जोडी जमली. ‘निराला हिंदुस्थान’ (१९३८) या सामाजिक चित्रपटानंतर ११ चित्रपटांत ही जोडी कायम होती.

‘साधना’ (१९३९), ‘सौभाग्य’ (१९४०), ‘भरतमिलाप’, ‘स्वामीनाथ’ (१९४२), ‘रामराज्य’ (१९४३), ‘उर्वशी’ (१९४६), ‘विधरांगणा’ (१९४७), ‘रामबाण’ (१९४८), ‘रामविवाह’ (१९४९), ‘रामायण’ (१९५४). राम-सीतेच्या भूमिकेतील ही जोडी भारतभर पसंतीस उतरली. या जोडीचे राम-सीताच्या चित्रांचे कॅलेंडर्स त्या काळात घरोघरी दिसत होते. त्यातही ‘रामराज्य’ या चित्रपटाने तिला सर्वोत्कृष्ट नायिकेचा दर्जा दिला. आजही त्या काळातील लोक तिची ओळख ‘रामराज्य’मधील सीता म्हणूनच सांगतात.

प्रारंभिक काळात तिने वास्ती, नझिर, बलवंतसिंग, याकूब, हरीश, चंद्रकांत जयराज, शाहू मोडक, अरुण आहुजा (गोविंदाचे वडील), चंद्रमोहन इ. बरोबर अनेक चित्रपटात कामे केलीत. १९४५ मध्ये पृथ्वीराज कपूर बरोबर ‘श्रीकृष्णार्जून युद्ध’ व ‘नलदमयंती’मध्ये कामे केलीत. त्याच वर्षी ‘वीर कुणाल’ चित्रपटात मुबारक बरोबर सम्राट अशोकाची राणी ‘तिष्यरक्षिता’चे काम करून अभिनयाची सर्वोत्कृष्ट उंची गाठली.

१९४९मध्ये शोभना पिक्चर्स नामे स्वतःची निर्मिती करून ‘हमारी बेटी’ चित्रपट काढला. यात तिने आपली ज्येष्ठ कन्या नूतनला नायिकेचा रोल दिला. त्यांनी १९६० साली ‘छबीली’ चित्रपटाद्वारे दुसरी कन्या तनुजाला चित्रपटात आणले. शोभना समर्थ यांचे निधन ९ फेब्रुवारी २००० रोजी झाले.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..