जगलो जरी सारे खेळ प्राक्तनाचे
तरी अर्थ जीवनाचा कळला नाही
भाळीचे, भोग भोगले जरी सारे
हव्यास मनीचा अजूनी सरला नाही
जडली नाती, जगता जीवन सारे
गूढ नात्यांचे आजही उकलले नाही
सत्य ! जन्मदात्यांचेच ऋणानुबंध
अन्य रक्ताची नाती कळलीच नाही
सारेच माझे, म्हणता संपला काळ
ओढ प्रीतीची ती जाणवलीच नाही
सांगा, या मनालाच कसे सावरावे
काहूर ! वेदनांचे कधी शमले नाही
जखमा साऱ्याच अजूनही ओल्या
लेप प्रीतचंदनी कुठे भेटलाच नाही
शोधीतो, मीच वाट आत्मसुखाची
रुसली पाऊले, तरी थांबणार नाही
— वि.ग.सातपुते. (भावकवी)
9766544908
रचना क्र. ४८.
१५ – २ – २०२२.
Leave a Reply