नवीन लेखन...

शोध स्वतःचा

शोध स्वतःचा

मी हरलो होतो हे युध्द.
रामाने रावणाला हरवून युध्द जिंकल,
भारताने इंग्रजांना नमवून स्वांतत्र्य जिंकल,
प्रियकराने प्रियसीला मिळवून प्रेम जिंकल, राजकरण्यांनी विरोधी पक्षांना रडवून सत्ता जिंकली
आणि
मी सगळच हरतोय अस मला वाटायला लागलय. आता मी काय हरलोय, तर मी भाकरी हरलोय एक वेळची. भाकरी हरलोय म्हणजे कळल का ? मी नोकरीची संधी हरलोय. नोकरी मिळवण म्हणजे एक मोठ युध्दच आहे आजच्या जगात.
फ्रेशर असतो त्याला अनुभव नाही म्हणून नाकारतात, अनुभव असणाऱ्याला मोठा पगार नाही म्हणून नाकारातात. आता तर मुलाखतीच होत नाही. आणि मुलाखती झाल्या तर
तुम्हाला हे येत नाही.
तुम्हाला अनुभव आहे पण या क्षेत्राचा नाही.
आम्ही एवढाच पगार देऊ शकतो.
करार करावा लागेल.
तुम्ही जास्त शिकलाय, तुम्ही कमी शिकलाय.
तुम्ही लांब राहता आम्हाला जवळचा माणूस हवाय
तुम्हाला एवढे कमी मार्क, तुम्हाला ड्रॉप होता, तुम्हाला केट्या होत्या.
आणि सर्वात शेवटच म्हणजे
फोन करुन सांगतो.
१८५ खाजगी कंपनीत मुलाखती दिल्यावर सरकारी नोकरीकडे जाण्याचा विचार केला तर तिथे खाजगी कंपन्यापेक्षा मोठी मारामारी सरकारी नोकरी मिळवण्यासाठी आहे.
अभ्यास करा पण तुमच यश पहिली तुमची जात ठरवणार नंतर कट अॉफ लिस्ट ठरवणार. सरकारी नोकरी म्हणजे जुगारच म्हणावा लागेल. रेल्वेच्या परिक्षेला गेलो तर सर्वात खालच्या पोस्ट साठी Mpsc चा अभ्यास पाहिजे असा तो पेपर होता.
पहिल सरकारी नोकरी करा म्हणून मागे पळत होते, आता कोण विचारत पण नाही.
शेवटचा पर्याय म्हणजे व्यवसाय.
आता व्यवसाय करायचा म्हटल म्हणजे त्या उद्योगधंद्यातल ज्ञान पाहिजे, ज्ञान असल तर भांडवल पाहिजे. आणि भांडवल मिळाल तरी लगेच फायदाच होईल असा काही नियम नाही.
आणि माझ मध्यम वर्गाय कुंटुंब तोट्यालाच घाबरत.
आणि अजून एक गोष्ट म्हणजे उद्योगधंदा नोकरीसारखा नसतो.
नोकरीत प्रत्येक महिन्याला समान पगार, पण धंद्यात या महिन्यात जेवढे निघाले तेवढे पुढच्या महिन्यात निघतील याची काही खात्री देता येत नाही. पण गाळ्याच भाड, लाईट बिल, सामुग्रीचे पैसे द्यावेच लागतात.
माझ काय खर नाही, मला काही जमणार नाही, नोकरीत साहेबाच्या शिव्या खायाच्या आणि धंद्यात ग्राहकांच्या शिव्या.
कंटाळा आला या फालतू आयुष्याचा. सगळ असून काही नसल्यासारखच आहे.
मी मध्यम वर्गीय कुंटुबातला. आई बाबा पैसे वाचावेत म्हणून गावी जाताना साध्या एस्टीने जातात. कुठे जवळपास जायाच असेल तर रिक्षाने प्रवास न करता चालत जातात. घरात काही कमी पडू नये म्हणून स्वतःच्या इच्छा मारतात. त्यांना अस बघून माझ मन जळत खूप.
माझी इच्छा आहे आई बाबांनी बिनदास्त खर्च करावा, हव तिथे फिराव, आवडेल ते खाव आणि सुंदर आयुष्य जगाव. कारण त्यांच अर्ध आयुष्य आम्हाला जपून आमची प्रगती करण्यातच गेल.
तो दिवस माझ्या शेवटच्या मुलाखतीचा आता गावी जाऊन शेती करायची हाच शेवटचा पर्याय होता.

१८६ वी मुलाखत नापास झाल्यावर उदास मनाने घरी चाललो होतो. अचानक जोरात पाऊस सुरु झाला पूर्ण अंग भिजून गेल. थंडीत कुडकुडत एका बसस्टॉपवर बसलो. जोरदार पाऊस, भयानक वारा आणि कडाडती वीज सगळ माझ्याच वाटेला. देव पण पार्टी करतोय माझ्या फेल होण्याची.
अचानक एक बाई समोर दिसली आणि तीच्या डब्यातून काही तरी काढून तीने कचऱ्याच्या डब्यात टाकून गेली. मी मनातल्या मनात बोललो इथ लोकांना मिळत नाही खायला आणि ही बाई कचऱ्याच्या डब्यात टाकून गेली. नंतर एक आश्चर्यकारक गोष्ट घडली.
ती गेल्यावर तिथ लंगडत लंगडत दोन पायाच कुत्र्याच पिल्लू आल. खरच त्याच नशीब पण माझ्यासारखच वाटू लागल तो भाकरीसाठी भटकतोय आणि मी नोकरीसाठी.
ते तिथ आल पण मी पाहत होतो ते काय करत ते.
त्याच्या मागचे दोन पाय अर्धे तुटलेले होते. ते पुढच्या दोन पायावर वजन सांभाळून उड्या मारत मारत कचऱ्याच्या डब्याजवळ गेल. तो कचऱ्याचा डबा त्या कुत्र्याच्या पिल्लापेक्षा उंच होता. जवळ गेल्यावर त्याने कचऱ्याच्या डब्यात उडी मारण्याचा प्रयत्न केला.
उडी जरासाठी कमी पडली. ते खाली पडल
परत उडी मारली परत पडल
परत उडी मारली परत पडल
अस पाच ते आठ वेळा झाल. भयानक पावसात त्याचे प्रयत्न बघून मला वाईट वाटत होत. नंतर तो दम लागल्याने थांबला. आणि थोडा वेळ थांबून तेच प्रयत्न परत करु लागल.
शेवटी कंटाळल ते निघून गेल. माझ्यासाखरच झाल बिचाऱ्याच. मी परत मोबाईलच बटण दाबल, मोबाईल ओरडला बँटरी ५%.वैतागून मोबाईल खिशात टाकला. आणि समोर बघतोय तर काय. ते कुत्र्याच पिल्लू परत आल होत. पण त्याची जागा दुसरी होती. कचऱ्याच्या डब्यापासून अंदाजे तीन फूट अंतरावर एक भिंत होती आणि तिथ ते येऊन उभ राहून तो कचऱ्याचा डबा बघत होत. ते बसल तिथे आणि परत दोन पायावर वजन देऊन त्याने कचऱ्याच्या डब्याकडे झेप घेतली आणि ती झेप यशस्वी ठरली. कचऱ्याच्या डब्यातली ती अर्धी चपाती घेऊन पर तो डब्यातून बाहेर पडून चपाती खाऊ लागल.
खरच त्याची जिद्द प्रयत्न आणि मेहनत बघून वाटल की मी अपयशाची हजार कारण देऊ शकतो पण यशासाठी केलेला एक प्रयत्न, मेहनत केलेल सांगू शकत नाही.
कुठे तरी मीच चुकत असल्याची मला जाणीव त्या कुत्र्याच्या पिल्लामुळे झाली होती.
माझ्या चुका माझ्यासमोर उभ्या राहून हसत होत्या. माझ्या अपयशाला मीच जवाबदार आहे सांगत होत्या. पावसाच्या सऱ्या पडतात तशा मी शांत होऊन भुतकाळात वाहत जात होतो.
शाळेत असताना अभ्यास कमी आणि टीव्ही गेमवर जास्त लक्ष दिल.
कॉलेजमध्ये अभ्यास सोडून चित्रपट, संगणक गेम मध्ये मी बुडून गेलो होतो.
आणि आता मी मोबाईलवर व्हॉटस्ॲप, फेसबुक, युट्युब च्या दुनियेत किती वेडा झालोय.
सोशल मिडीयाच्या जाळ्यात एवढा फसलोय कि घरातल्यांना वेळच देण विसरलोय.
सकाळी उठल की लोक देवाच्या पाया पडतात आणि मी व्हॉटस्ॲपवर कुणाचा संदेश आला, ग्रुप वर काय चाललय, फेसबुकवर किती जणांनी माझ्या फोटोला लाईक दिले, काय आणि किती कंमेट आल्या हे बघतो. रात्री मोबाईल कितीही वेळ वाया घालवीन पण दिवसभर काम करुन थकलेली आई बोलली बाळा पाय दुखतायत दाबतोस का तर मला झोप येते. आईने छोट काम सांगितल की मला कंटाळा येतो.
मला माझ्या अपयशाच खर कारण कळल होत.
माझ कंटाळा करण,
माझा आळशीपणा,
माझ फेसबुक, व्हॉटस्ॲप, युटुब्यच व्यसन,
आयुष्यतल्या वेळेचा अपमान,
अतिहुशारी,
अर्थ नसलेली बडबड.
खरच मी आता स्वतःच्या नजरेत एका झटक्यात पडालो, माझी गरजच नाही कशाला जन्माला आलो हाच प्रश्न पडला. खरच घरात बसून असलेल्या मला खरतर घरातून बाहेर हकलल पाहिजे. तर आई बाबांच निस्वार्थ प्रेम मिळतय. कर्जाच्या बोझाखाली वाकलेले आणि लवकरच नोकरीपासून निवृत्त होणारे बाबा कधीच काय बोलले नाही.
नको आपला भार आई वडलांना मरुया आपण हाच विचार डोक्यात फिरु लागला.
मग एक विचार आला डॉक्टरांना भेटू आणि सगळ शरीर स्वइच्छेने मोफत दान करु. निदान आई बाबाने वाढवलेले शरीर कुणाच्या तरी उपयोगी येल. मी डोळे बंद करुन खोल विचारात बुडलो होतो. आणि
अचानक पायाला थंडथंड पाणी लागायला लागल बघतोय तर काय तो दोन पायाचा कुत्रा इथ येऊन माझा पायापाशी येऊन झोपला. खरच जवळून पाहिल तर पूर्ण ओलाचिंब भुकेने व्याकुळ जीभ बाहेर काढून बसला होता. मी बँग मधून आईने दिलेला डबा काढला. आई सकाळी लवकर उठून चार चपात्या आणि माझी आवडती गवारीची भाजी केली होती. खरच एवढ्या थंड पाऊसात आईने प्रेमाने बनवलेल्या चपात्या गरम जाणवत होत्या. त्या कुत्र्याला वास येताच तो शेपूट हलवू लागला. त्याला मी दोन चपात्या दिल्या. आणि मी डबा खायाला लागलो आणि खाता खाता विचार करु लागलो.
खरच मरण हा योग्य पर्याय आहे. हे र्निव्यसनी चांगल शरीर दान करुन मी एकाच भल करु शकतो पण जगून मी नक्कीच जास्त लोकांच भल करु शकेन.

आई बाबांनी २५ वर्ष सांभाळल, प्रेमाने वाढवल त्याचा मोबदला म्हणून त्यांना स्वतःच प्रेत देण किती योग्य आहे.
त्याच्या प्रेमाची परत फेड त्यांचाच अश्रु ने करण किती योग्य आहे.
नाही मी मरणार नाही.
हा कुत्रा त्याला कळलय आपला काय फायदा नाही आपल्याला दोनच पावलावर आयुष्य जगायच आहे तरी तो जगतोय. मी तर चांगला असून मरणाच्या गोष्टी करतोय
महान लोकांचा जन्म झालाय अशा भारतदेशात मी जन्म घेतला,
महाराष्ट्रातल्या सौदर्याने नटलेल्या आणि वीरांच्या राज्यात माझा जन्म झाला, आणि मी डरपोक सारखा मरणाच्या गोष्टी करतोय.

नाही मी जगणार
आणि आई बाबांना अभिमान वाटेल अस जगणार,
महान माणसांना बर वाटेल अस वागणार. पाऊस थांबला. मी घरी जायाला निघालो. चालताना एक विचार केला आत्ता मला माझ्या चुका कळाल्यात त्या मी सुधारणार.
दुसऱ्या दिवशी सकाळी ६ला उठलो आणि बाहेर फिरायला गेलो. ७ ला परत घरी आलो आणि आंघोळ आटपून आई बाबांच्या पाया पडलो. आई बाबांना आश्चर्य वाटल
आईः तुझा वाढदिवसतर फेब्रुवारीत आहे ना ? हा तर जुलै महिना आहे.
मीः हो मग
आईः पाया पडलास म्हणून म्हटले रे.
मीः नाही सहज वाटलो म्हणून पडलो. तु बोलतेस सकाळी उठून देवाच्या पाया पडाव. माझे देव तर तुम्हीच.
आईः आज सुर्य पश्चिमेला उगवला का रे ?
मीः नाही ग पूर्वेलाच आहे. चल मी निघालोय. बाबा कुठायत.
आईः थांब लगेच पळू नको. तुला आवडतात म्हणून पोहे केलेत ते खाऊन जा. बाबा बाहेरच्या खोलीत आहेत. डब्याला काय करु सांग. दहा मिनटात बनवते.
मीः बर. मी जेवायला येतो दुपारी.
बाबांच्या पाया पडलो.
बाबाः अॉल द बेस्ट. पण आज कोणती परिक्षा आहे. वाढदिवस तर फेब्रुवारीत आहे.
मीः आज काय नाही. तुमचा मोबाईल द्या.
बाबाः कशाला ?
मीः माझा मोबाईल तुम्ही वापरा. मी तुमचा वापरतो. अहो अॉफिसर आहात तुम्ही.
बाबाः मला नाय कळत काय त्याच्यातल
मीः अहो शिका. लहान पोरांना कळत तुम्हाला तर लगेच कळेल. मी आहेच सांगायला.
बाबाः मी बिघडवेन काय तरी.
मीः काय व्हायच ते होऊ दे, तुम्ही एक महीना वापरुन बघा.
बाबाः बर.
मी नाश्ता करुन सरळ आमच्या जवळच्या टेकडीवर येऊन चुका कशा सुधरायची याचा अभ्यास करु लागलो.
नंतर नवीन नवीन गोष्टी उमजत गेल्या.
सकाळी लवकर उठून पळायल जायाला सुरवात केली. त्यामुळे दिवस ताजा जायाला लागला, भूक वाढली, शरीराला येणारा कंटाळा दूर झाला.
आपण आज काय केल हे स्वतःला विचारल पाहिजे.
मी आज काय नाही केल तर माझ्या आयुष्यातला एक दिवस वाया गेला आणि मला आता दिवस वाया जाऊन द्याचे नाहीत. आयुष्य किती आहे माहिती नाही पण जेवढ आहे ते महत्त्वाचे आहे.

खरच १८६ कंपनीत मी मुलाखत दिल्या पण एका पण मुलाखतीची मी कधीच पूर्व तयारी केली नव्हती.
मग यासाठी मी माझा परत चांगला, आणि महत्त्वाचे विषय असलेला बायोडेटा बनवला. बायाडेटा नुसता बनवून चालत नाही. आपल्या बायोडेटाच्या प्रत्येक लिहलेल्या शब्दातूनच मुलाखत घेणारा प्रश्न तयार करतो. बायोडेट्यात प्रत्येक शब्दावर मी अभ्यास केला.
१८६ मुलाखतीतल्या १०० मुलाखतींचा काही उपयोगच नव्हता तेव्हा कळाल.
तुम्ही जिथे मुलाखतीसाठी जाणार. त्या कंपनीबद्दल तुम्हाला माहिती असण गरजेच आहे. नंतर कोणत्या पदासाठी मुलाखत आहे ते कळण महत्त्वाच आहे. नंतर जे पद आहे त्याला काय शिक्षण हव काय अनुभव हवा ते महत्त्वाच आहे.
अनुभव नसला तरी त्या पदाला काय ज्ञान हवय हे महत्त्वाच आहे.
तेव्हा जाणवल मी द्याच म्हणून मुलाखती देत होतो. आणि जगातला सर्वात मोठा मूर्ख मीच असेन.
५० कंपनीत मी अभ्यास न करता गेल्यामुळे पहिल्या ॲप्टीट्युड टेस्ट मध्येच फेल व्हायचो.
३६ कंपनीत माझ्या बायोडेट्यावरील अनुभवामुळे फेल झालो. ४ कंपन्यांचा अनुभव पण एका कंपनीत पण मी ६ महिन्यावर टिकलो नाही.
आत्ता कळतय. अनुभव म्हणजे अॉफिसमध्ये ८ तास भरणे नसत. त्या ८ तासात तुम्ही काय काम करुन काय शिकला हे महत्त्वाच असत.
आता हा पूर्ण अभ्यास करुन मी परत मुलाखती सुरु केल्या.
पहिल्याच मुलाखतीत यशस्वीरित्या निवडलो गेलो.
दोन वर्ष त्याच कंपनीत काम करताना खाजगी कंपन्याबद्दल खूप गोष्टी कळाल्या. नंतर मी सरकारी नोकरीसाठी प्रयत्न सुरु केले.
मी आधी आळशीपणाने बोलायचो हे शक्यच नाही. पण आता माझ्यात तो नकारार्थी विचार नव्हता. मी सरकारी परिक्षेचा अभ्यास सुरु केला
एक वर्ष नापास झालो. नंतर कळल की पहील सरकारी नोकरीतला अभ्यासक्रमानुसार अभ्यास करायचा. सरकारी नोकरीत ज्या पदांना समान अभ्यासक्रम आहे. तो अभ्यास सुरु केला. कमी वेळात अचूक उत्तरांचा सराव केला.
तेव्हा कळल. प्रत्येक माणूस हा त्याच गोष्टी सारख्या सारख्या करुन शिकतो.
इंग्रजी शिकायच ठरवल आधी एक महिना एक पान वाचून कळून घेण्यासाठी दीड तास लागत होता. आता वीस मिनटात सर्व पेपर आरामात वाचून होतो.
माणूस गोष्टी करुन चुकतो
गोष्टी चुकून चुकून चांगल शिकतो.
सरकारी नोकरीचा पण अभ्यास चालू होताच. आणि तिसऱ्या वर्षी सरकारी नोकरीत जागा मिळवली. आणि परत ५८ वर्षाचा प्रवास झाल्यांनतर निवृत्तीच्या दिवसांनंतरच पण मी वेळापत्रक आत्त्ताच बनवल. उद्योगधंदा करायचा.
आयुष्यात खूप गोष्ट समजल्या
तुमच्या संकटाला तुम्हालाच तोंड द्याचय.
आईबाबा आयुष्यभर पुरणार नाहीत.
अभ्यास कधीच संपत नाही.
भरपूर यशस्वी माणसांच्या भाषणात मी पाहिलय त्यात एक दिसल त्यांनी त्यांना आलेली संकट आणि त्यांनी त्याचा संघर्ष कसा केला ते सांगितल, पण त्यांनी हे सांगितल नाही की काय केल पाहिजे.
सोशल मिडिया मी एक महिन्यानंतर परत वापरायला सुरवात केल कारण ही काळाची गरज आहे. पण आता त्याच व्यसन नाही. मी फक्त वयक्तित आलेल्या आणि कामाच्या संदेशांना प्रतिउत्तर देतो.
फेसबुक व्हॉटस्ॲप युट्युब मी घरी वापरत नाही. फक्त प्रवासात वापरतो. फेसबुक नोटीफिकेशन दिवसात वेळ मिळाला तर बघतो.
युट्युब आणि गुगल मी खूप वापरतो पण चित्रपटासाठी नाही तर फक्त ज्ञानासाठी.
घरी आलो की घरात लागेल ती मदत करायची आणि घरातल्यांना वेळ द्याचा.
सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वाचन. मी वेळ मिळाला कि वाचन करतो. रविवारी दुपारी झोपायच नाही तर पुस्तक वाचायच. एका महिन्यात कमीत कमी दोन पुस्तक वाचून झालीच पाहिजेत.
माझ्या यशाची तुलना मी कुणासोबत करत नाही. माझ यश माझी प्रगती.
स्पर्धापरिक्षेच्या अभ्यासामुळे पेपर दररोज वाचायचोच.
मी आज यशस्वी आहे.
यशाची व्याख्या प्रत्येकासाठी वेगळी असते. माझ्यासाठी यश म्हणजे
स्वतःचा शोध घेणे,
स्वतःवर अभ्यास करणे,
स्वतःच्या चुका काढणे,
स्वतःच त्या चुकांवर उत्तर शोधून त्या दुरुस्त करणे.
आयुष्य खूप सुंदर आहे आणि स्वतःचा शोध घेण महत्त्वाच आहे.

निओ माझ्यासोबतच राहतो.
निओ म्हणजेच तेच मला भेटलेल दोन पायाच कुत्र्याच पिल्लू.

लेखकाचे नाव :
अक्षय सुर्यकांत कुंभार
लेखकाचा ई-मेल :
maneklekhak@gmail.com

Avatar
About Guest Author 525 Articles
मराठीसृष्टीवर ज्या लेखकांनी स्वत:चे अकाऊंट बनवले नाही त्यांचे लेख या Guest Author द्वारे प्रकाशित होतात. आपले सर्व लेख एकत्रितपणे मिळवण्यासाठी स्वत:चे अकाउंट मराठीसृष्टीवर जरुर बनवा.

3 Comments on शोध स्वतःचा

  1. खूप छान सर आज सकाळी सकाळी मनापासून वाचलेल्या लेख तुमचा have nice day sir
    And thank u so much sir ???

  2. शेवट वाचून खूप आनंद झाला सर .माझं पण आयुष्य असंच आहे तुमच्यासारखं. करतोय अजून प्रयत्न, सध्या सीए च्या ऑफिस मध्ये आर्टिकलशिप करतोय.

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..