शोधू पुस्तकात भिमाला
घेऊ मस्तकात भिमाला ||धृ||
निसर्ग न्यायाने वागला
पाणी पाजताना गर्जला
असा महामानव जाहला
तळपत्या सूर्याने पाहिला ||१||
देह लेखनीत झिजला
अश्रू पापणीत टिपला
संविधानी कायदा केला
पाईक समतेचा झाला ||२||
हुंकार वेदनेचा साहिला
न्याय बहुजनां दिधला
माय दुबळ्यांची झाला
नेता जगी असा पहिला ||३||
शिकण्याचा मार्ग चांगला
संघटन गुण शिकविला
संघर्ष अंगार पेटविला
धार लावून लेखनीला ||४||
रयतेचा राजा नीतीला
शाहूराजे जे मदतीला
बुध्द वंदनीय जाहला
सयाजीराव ते साथीला ||५||
— विठ्ठल जाधव.
संपर्क: ९४२१४४२९९५
शिरूरकासार , जि.बीड
Leave a Reply