
इशू सम्राट बापू बहाद्दर याना महाराष्ट्रात कोण ओळखत नाही? कुठल्याही अशक्य गोष्टीचा ‘इशू’ करून बोंबा बोंब करणे, मोर्चे काढणे आदी कारवाया करत बडे राजकीय प्रस्थ बनलेले अडाणी बापूबहाद्दर यांना अचानक एका घटने मुळे खात्री पटते की “पायथागोरस” मुळे शाळेत शिकणाऱ्या लहान मुलांची डोकी बिघडतात. या अचानक मिळालेल्या संधीचा फायदा घेऊन ते आपले राजकीय वैरी शिक्षण मंत्री आणि पर्यायाने विद्यमान सरकार या दोघांना बिनबुडाचा इशू करत खाली खेचण्याचा प्रयत्न करतात. सरकार पडण्याचा त्यांचा डाव यशस्वी होतो का? पहा विनोदी लघुपट “पायथागोरसचे अदभूत प्रकरण”
Leave a Reply