आपल्या समाजात अंधश्रद्धा खूप जास्त प्रमाणात वाढलेली आहे. अंधश्रद्धा आणि श्रधा या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. जुने लोक सांगत आले म्हणून आपण आज तसे वागतो. जुने लोकांनी सांगितला ते योग्य आहेच. त्यात काही प्रश्न नाही. पण माणसांनी काळा नुसार स्वतःचा नजरिया बदलायला हवा. अमुक केल्याने तमुक होते तमुक केल्याने अमुक होते असे काही नाही.
देव धर्म , या सगळ्या गोष्टी आहेत. माझा या गोष्टींवर पूर्ण विश्वास आहे. पण देव धर्माच्या नावाखाली अंधश्रध्दे चा बाजार करू नये हीच इच्छा. बरेच लोकांचे असे म्हणणे आहे की देव वगैरे काही नसतात. सगळ सायन्स आहे. पण हे खोटं आहे. सायन्स हे रक्त कस बनवायचं हे सिद्ध नाही करू शकल. म्हणजेच रक्त बनऊ नाही शकल. सायन्स नी अजून पर्यंत हवा आपल्याला प्रत्यक्षात दाखाऊ नाही शकल.
सायन्स अजून पर्यंत व्हेन्स म्हणजे नसा बनऊ नाही शकल. डॉ.अब्दुल कलाम यांनी स्वतः त्यांच्या एका भाषणात म्हटलेले आहे की आपण या जगाला चालवतो, पण आपल्याला चालवणारी आपल्याला कंट्रोल ठेवणारी एक शक्ती वर आहे. ते तर स्वतः एक खूप मोठे सायंटिस्ट होते.
कोणी म्हणते काळी मांजर रस्त्यावरून आडवी गेली तर रस्ता ओलांडू नये. का ? त्या मांजरीला रस्ता ओलांडण्याचा अधिकार नाही ? मग माणसांनी रस्ता ओलांडला तर तिथून कोणाच्यही प्राण्याला तिथून जाणे योग्य नाही. प्राण्यांना देवांनी ही शक्ती दिली आहे की त्यांना त्यांच्या गुणांनुसार पुढे काय होणार आहे हे आधीच लक्षात येते. असे म्हणतात. कुत्रे रडायला लागले की काही तरी अशुभ होईल असे म्हणतात. पण जर कुत्रे रडलेच नाही तर अशुभ होणारच नाही असं खरंच होईल का ?
वास्तुशास्त्र नुसार आपल्या समाजात बरेच लोकांचे म्हणणे आहे की दक्षिण दिशेला पाय करून झोपू नये. ते शरीरासाठी हानिकारक असते. ही बरेच लोक अंधश्रद्धा समजतात. पण खरे पाहता जुने लोक जे सांगतात ते गोष्ट जर आस्थे नुसार बघितली तर त्यांची स्वच्छ मनानी केलेली , सांगितलेली श्रद्धा आहे पण सध्याच्या परिस्थितीने पाहिले तर ते सायंटिफिक त्याला कारण पण आहे. ते असे की, दक्षिण दिशेकडे पाय करून झोपल्यानंतर डोक्यातून चुंबकीय प्रवाह येतो आणि पायात प्रवेश करतो. यामुळे, मानसिक ताण वाढतो आणि आपण सकाळी उठल्यावर आपले मन दुःखी वाटते, मन अस्वस्थ राहते.
आपल्या समाजातील अंधश्रध्दा ही योग्य त्या ठिकाणी लोकांनी दाखवायला हवी. जिथे जिथे खोटारडेपणा दिसेल जिथे फसवणूक दिसेल जिथे देवाच्या , धर्माच्या नावाखाली लोकांना दिशाभूल करण्याचे काम होत असेल तिथे अंधश्रद्धा दाखवायला हवी. पण जिथे देव धर्म, आस्था – मनं जुळले असतील तिथे आपली श्रध्दा असायलाच हवी. नऊ ग्रह कोणी बनवले ? Eliments कोणी तयार केले ? ब्रम्हांड आणि आकाशगंगा कोणी बनवल्या ? समुद्र कशे बनले आहे बरेचशे प्रश्न अजून पण अनुत्तरीतच आहेत. ही अंधश्रद्धा नाही तर वास्तव आहे.
आपल्या समाजात बरेच लोक अशे पण म्हणतात की , तुमचा घरात हे गेलेत, ते गेलेत तुमचे घर लाभी नाहीत, दुसरे घर घ्या, जागा बदलवा. पण मला अस वाटते की हे घर जर लाभी नाही म्हणून एखाद्याने दुसरे घर घेतले तर त्याचा घरात कोणी जाणारच नाही का ? त्याच्या आयुष्यात समस्या येणारच नाही का ?
यावर मला स्वामी समर्थांच्या दोन ओळी आठवल्या..
जगी सर्व सुखी असा कोण आहे..
विचारे मना तूची शोधूनी पाहे…..
माझा देव – धर्म , नशीब , विधी लिखित असणे या सगळ्या गोष्टींवर पूर्ण विश्वास आहे. पण काही गोष्टी आपल्या पण हातात असतात जेणे करून आपण आपल्या समस्यांना श्रध्देने आणि हिमतीने सामोरे जाऊ शकतो. शेवटी इतकेच सांगतो की, आपल्या समाजातील लोकांनी श्रद्धा ठेवावी पण अंधश्रध्दा ठेऊ नये. (कळत नकळतपणे माझ्या या लेखातून कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर त्या साठी क्षमा असावी.)
निनाद चंद्रकांत देशपांडे
अमरावती
९९२२६१३००१.
Leave a Reply