मनाच्या घसरड्या वळणाच्या प्रत्येक कृतीला,धरावा लागतो धीर श्रद्धा-सबुरीचा !कोणी पसरतात काटे कुतार्काचे अटकावण्या पावलांना,नाही टोचत काटे श्रद्धा-सबुरीमुळे पावलांना !चरख्यावर सुत कातताना लागते श्रद्धा व सबुरी,नसते तीच आमच्यात क्षणभरी !चंदनासारखे झिजण्या लागते मन मोठे,श्रद्धा-सबुरीने पडते पदरात फळ मोठे !सोन्या चांदीचे लेणे लेऊन होत नाही कोणी मोठे,सोन्या चांदीचे जेवायला लागते श्रद्धा-सबुरीचे ताट मोठे !संतांची कामे देवानेहि केली होती हे ठाऊक आम्हा,म्हणून का ते झाले इतिहास जमा,परमात्मा आहे ब्रम्हांडा एवढा,परंतु त्याच्यावरील विश्वास साखरेच्या कणा एवढा ! श्रद्धाने जगलो तर, तेही होईल या जन्मा !!
जगदीश पटवर्धन, वझिरा, बोरीवली (प.)
— जगदीश पटवर्धन
Leave a Reply