नवीन लेखन...

श्रवणभक्ती

विश्वाचे नियंत्रण करणाऱ्या सर्वसत्ताधीश परमात्म्याविषयी अंतःकरणात प्रेम निर्माण होणे याचे नाव भक्ती. ही सारी सृष्टी त्या ईश्वराचीच विविध रूपे आहेत असे वाटू लागणे, त्याअनुरूप आपला व्यवहार होणे ही भक्तीची परिसीमा

जे जे भेटे भूत । ते मानिजे भगवंत ।।
हा भक्तियोग निश्चित । जाण माझा ।।

असे ज्ञानेश्वरीचे वचन सर्वश्रुतच आहे. ही प्रेमस्वरूप भक्ती अंतःकरणात दृढ व्हावी यासाठी विविध साधना प्रकार सांगितले आहेत. परमभागवत प्रल्हादानी भक्तीचे नऊ प्रकार वर्णिले आहेत. प्रवर्ग, कीर्तन, विष्णोःस्मरणम्, पादसेवन, अर्चन, वंदनं, दास्य, सख्यात्मनिवेदन, यातील पहिल्या  पण काहीतरी ऐकू येणे किंवा ऐकणे म्हणजे श्रवण नव्हे. श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ गुरमुखत् श्रुति वाक्यार्थ विज्ञानम्-श्रवणं ब्रह्मवेत्ते पुरुष, ज्ञानी भक्त, संत सत्पुरुष यांच्या वचनातून सद्ग्रंथातून व्यक्त होणारा तत्त्वविवेक, ईश्वराच्या विविध कथा, त्यांच्या गुणांचे संकीर्तन श्रद्धापूर्वक ऐकणे म्हणजे श्रवण. कानावर पडणारा प्रत्येक शब्द ऐकू येतो. कानासोबत मनाने तो ग्रहण करून त्याचे मनन घडणे श्रवणात अपेक्षित आहे. आपणही व्याख्याने, प्रवचने, कीर्तने, चिंतनादी ऐकत असतो. या ऐकण्यात आपली भूमिका काय असते हे पाहणेही महत्त्वाचे आहे. “गाते श्रोते आणि पाहाते. चतुर, विनोदी, दुश्चिते। सोहंभावे ज्ञाते। त्या सकळाते विनवणी” असे श्रोत्यांचे प्रकार ज्ञानदेवांनीच सांगितले आहेत. काही श्रोते केवळ वक्त्यांची परीक्षा घ्यायला आले असतात काहिंची दृष्टी दोष शोधण्याची असते. काही श्रोत्यांच्या डोक्यात वेगळेच विचारचक्र सुरू असते, काही केवल शैलीवर त्यामुळे आशय लक्षात येत नाही. लय विक्षेर कपाय आणि रसास्वाद असे काही प्रमुख दोष सांगितले आहेत. त्याशिवाय काही आणखीही श्रवण साधनेच्या आड येणारे दोष आहेत. मुख्य म्हणजे जी संतवचने किंवा गुरुमुखातून ज्ञान ऐकतो. त्यावर श्रद्धा असणे आवश्यक आहे. मला हे सगळे कळले पाहिजे ही जिज्ञासा असावी लागते. अवधानपूर्वक एका श्रवणाने श्रोत्यांचे हृदयपरिवर्तन घडल्याच्या अनेक कथा आहेत. अग्निच्या सान्निध्यात शीत, भीती आणि अंधःकार नाहीसे होतात तसेच संतसत्पुरुषांच्या वचनांच्या श्रद्धायुक्त श्रवणातून अज्ञानाचा निरास, यथार्थज्ञानप्राप्ती आणि अंतःकरणात परमेश्वराची भक्ती या तीनही गोष्टीचा लाभ होतो म्हणून श्रद्धायुक्त श्रवण महत्त्वाचे आहे.

-वा.गो. चोरघडे

संकलन : शेखर आगासकर

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..