श्रावण एक पवित्र महीना
असे पुजा-पाठांचा
प्रत्येक वारी व्रत वेगळे
महिमा देवी-देवतांचा
ऊन पावसाचा खेळ चाले
नजारा इंद्रधनुष्याचा
सणासुदीची सुरुवात होई
पहीला सण नागपंचमीचा
नारळीभाताची लज्जत भारी
सण आगळा रक्षाबंधनाचा
कृष्ण जन्माष्टमी साजरी होई
तरुणाईत उत्साह दहीहंडीचा
अळूवडी आणि अळूचे फतफत
बेत शाकाहारी जेवणाचा
सत्यनारायण पूजा घरोघरी
साधकास लाभ श्रवणाचा
श्री.सुनील देसाई
१०/०८/२०२२
Leave a Reply