वसन्ते सानन्दे कुसुमितलताभि: परिवृतेस्फुरन्नानापद्मे सरसि कलहंसालिसुभगे।
सखीभि: खेलन्तीं मलयपवनान्दोलितजले
स्मरेद्यस्त्वां तस्य ज्वरजनितपीडापसरति।।२०।।
आई जगदंबेच्या सौंदर्याचे खरे वैभव हे आहे की ते सौंदर्य पाहणाऱ्याच्या मनात वासना नव्हे तर वात्सल्य जागृत करते. पाहणाऱ्याला तापवत नाही तर त्याचा ताप दूर करते.
या वैभवाला अधोरेखित करताना , इतर वेळी मानवी भावनांना चंचल करणाऱ्या समस्त गोष्टींचे वर्णन आचार्य करीत आहेत.
वसन्ते म्हणजे वसंत ऋतूमध्ये, सानन्दे म्हणजे अत्यंत आनंदपूर्णरीत्या, कुसुमितलताभि: परिवृते अर्थात फुलांनी डवरलेल्या वेलींनी वेढलेल्या.
स्फुरन्नानापद्मे- विविध कमळे जिथे उमलली आहेत अशा.
कलहंसालिसुभगे – कल म्हणजे आवाज करणाऱ्या, हंसाली म्हणजे हंसाचा रांगेने, सुभगे म्हणजे शोभायमान असणाऱ्या, सलिले अर्थात जलाशयात.
मलयपवनान्दोलितजले- मलय पर्वतावरील पवन म्हणजे वाऱ्याने आंदोलित होत असणाऱ्या जलामध्ये,
सखीभि: खेलन्तीं – आपल्या सखींसह जलक्रीडा करीत असणाऱ्या, स्मरेद्यस्त्वां तस्य – तुझे जो स्मरण करतो त्याची,
ज्वरजनितपीडापसरति- ज्वरजनित म्हणजे तापामुळे निर्माण होणारी पीडा दूर होते. खरा ताप आहे संसाराचा. तो ताप आईचा चरणकमली नष्ट होतो.
अन्य अप्सरांचे, सौंदर्यवतींचे अशा प्रकारच्या वसंत काळातील जलक्रीडा करणारे सौंदर्य पाहिले तर पाहणार्याला मदन ताप जडू शकतो.पण आई जगदंबेच्या सौंदर्याने जगातील सर्व ताप दूर होतात. हेच तिच्या सौंदर्याचे खरे वैभव आहे. ते तापहारक आहे.
त्यासाठीच तिच्या चरणी विनम्र प्रार्थना.
इति आनंदलहरी !
जय जगदंब !
— प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply