नवीन लेखन...

समर्थ रामदास स्वामींनी लिहिलेली गणपतीची संपूर्ण आरती

Shree Ganesh Aarati by Samartha Ramdas Swami

समर्थ रामदास स्वामींनी लिहलेली गणपतीची प्रचलित आरती आपण म्हणतो. ती फ़क्त 2 कड़वी म्हटली जातात. पण मूळ आरती ७ कडव्यांची आहे. ती खालीलप्रमाणे आहे

 

सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची ।

नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची ॥

सर्वांगी सुंदर उटि शेंदुराची ।

कंठी झळके माळ मुक्ताफळांची ॥१॥

जय देव जय देव जय मंगलमूर्ती ।

दर्शनमात्रे मनकामना पुरती ॥ध्रु०॥

 

रत्नखचित फरा तुज गौरीकुमरा ।

चंदनाची उटी कुंकुमकेशरा ॥

हिरेजडीत मुकुुट शोभतो बरा ।

रुणझुणती नूपरें चरणीं घागरिया ॥ जय० ॥२॥

 

माथा मुकुट मणी कानी कुंडले ।

सोंड दोंदावरी शेंदुर चर्चिले ।।

नागबंद सोंड-दोंद मिराविले ।

विश्वरूप तया मोरयाचे देखिले ॥ जय० ॥३॥

 

चतुर्भुज गणराज बाही बाहुटे ।

खाजयाचे लाडू करुनी गोमटे ।।

सुवर्णाचे ताटी शर्करा घृत ।

अर्पी तो गणराज विघ्ने वारीतो ॥ जय० ॥४॥

 

छत्रे चामरे तुजला मिरविती ।

उंदीराचे वाहन तुजला गणपती ।।

ऐसा तु कलीयुगी सकळीक पाहसी ।

आनंदे भक्तासी प्रसन्न होसी ॥ जय० ॥५॥

 

ता ता धि मि किट धि मि किट नाचे गणपती ।

ईश्वर पार्वती कौतुक पाहती ।।

ताल मृदंग वीणा घोर उमटती ।

त्यांचे छंदे करुनी नाचे गणपती ॥ जय० ॥६॥

 

लंबोदर पीतांबर फणिवरबंधना ।

सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना ॥

दास रामाचा वाट पाहे सदना ।

संकटीं पावावें निर्वाणीं रक्षावें सुरवर वंदना

॥ जय ० ॥ ७ ॥

 

जय देव जय देव जय मंगलमूर्ती ।

दर्शनमात्रे मनकामना पुरती ॥॥

 

!!गणपती बाप्पा मोरया!!

 

3 Comments on समर्थ रामदास स्वामींनी लिहिलेली गणपतीची संपूर्ण आरती

  1. समर्थ रामदास स्वामींनी लिहीलेली गणपतीची आरती त्यांच्या कोणत्या ग्रंथात आहे ?
    सविस्तार माहिती हवी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..