श्रुत्यै नमोऽस्तु शुभकर्मफल प्रसूत्यै रत्यै नमोऽस्तु रमणीय गुणार्णवायै। शक्त्यै नमोऽस्तु शतपत्रनिकेतानायै पुष्टयै नमोऽस्तु पुरूषोत्तम वल्लभायै।।११।।
विविध रूपामध्ये भक्त कल्याणाचे कार्य करणाऱ्या श्रीमहालक्ष्मीच्या चार विविध रूपांचे वर्णन आचार्यश्री येथे करीत आहेत. श्रुती, रती, शक्ती आणि पुष्टी अशा चार रूपात आई जगदंबेचे कार्य चालते. त्यांना वंदन करतांना आचार्यश्री त्यांच्या कार्याचे स्वरूपही स्पष्ट करीत आहेत.
श्रुत्यै नमोऽस्तु- आईच्या श्रुती स्वरूपाला नमस्कार असो. जी,
शुभकर्मफल प्रसूत्यै- शुभ कर्माचे फळ निर्माण करते.
शुभ, पवित्र, पुण्यदायक कार्याचे मार्गदर्शन वेदात, शास्त्रात दिलेले असते. याच कारणाने वेदाला श्रुती म्हणतात.
रत्यै नमोऽस्तु- जगदंबेच्या रती स्वरूपाला नमस्कार असो. रती म्हणजे आवड. मानवाला कशाची आवड असावी? तर रमणीय गुणार्णवायै- रमणीय अर्थात आनंददायक. गुणार्णव म्हणजे गुणांचा सागर. तशी अपार गुणसागर असणारी आई महालक्ष्मी भक्तांच्या मनात रती रूपात कार्य करते.
शक्त्यै नमोऽस्तु- आईच्या शक्ती स्वरूपाला नमस्कार असो. जी शतपत्रनिकेतानायै- शतपत्र अर्थाची शेकडो पाकळ्यांचे कमळ. त्यामध्ये निवास करणारी. एवढं जसे महालक्ष्मीच्या रूपाचे आहे तसेच मूल बुद्धी स्वरूपाचे आहे. मानवी मेंदू मध्ये असणाऱ्या सहस्त्रार चक्रात निवास करणाऱ्या आदिशक्तीचे ते वर्णन आहे.
पुष्टयै नमोऽस्तु- भगवती पुष्टीला वंदन असो.जी
पुरूषोत्तम वल्लभायै- भगवान पुरुषोत्तम अर्थात श्रीविष्णूंची वल्लभा अर्थात प्रियतमा आहे.
— विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply