नवीन लेखन...

श्री कृष्णाची भक्ताला मदत

घटना घडली एके दिवशी    प्रभू बसले जेवण्या

रुख्मिणी त्यांचे जवळी    होती वाढण्या  ।।१।।

चट्कन उठूनी ताटावरुनी    धावत गेले दारीं

क्षणिक थांबूनी तेथे    येऊनी बसले पाटावरी  ।।२।।

प्रश्न पडला रुखमिणीस   काय गडबड झाली

श्रीकृष्णाची धावपळ    तिजला नाही कळली  ।।३।।

चौकशी करतां कृष्ण बदले    कहानी एका भक्ताची

हरिनाम मुखी नाचत होता    काळजी नव्हती लोकांची  ।।४।।

वेडा समजोनी त्यासी    दगड होते मारीत

हरिनाम नाही सोडले     वाहात असूनी रक्त  ।।५।।

धावलो होतो त्याचेसाठीं    करण्या त्याला मदत

परि लहू बघूनी अंगावरती     दगड घेतला हातात  ।।६।।

समर्थ झाला आता तो    रक्षण करण्या स्वतःचे

हरिनाम सोडता मुखातून    कारण नव्हते मदतीचे  ।।७।।

ही झाला छोटी कहाणी    सांगे जीवनाची तत्वे

सर्वस्व अर्पिता प्रभूसी    विश्वास ठेवा त्याते  ।।८।।

 

— डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

Avatar
About डॉ. भगवान नागापूरकर 2132 Articles
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..