प्रातः स्तुवे परशिवां ललितां भवानीं त्रय्यन्तवेद्यविभवां करुणानवद्याम्।विश्वस्य सृष्टि-विलय-स्थितिहेतुभूतां
विद्येश्वरीं निगमवाङ्गमनसाविदूराम्॥४॥
प्रातः स्तुवे – प्रातःकाळी अर्थात सूर्योदयाच्या देखील पूर्वी, डोळे देखील उघडण्याच्या आधी, मी स्तुती करतो.
परशिवां- पर म्हणजे अत्यंत श्रेष्ठ. शिव म्हणजे अत्यंत पवित्र. अत्यंत श्रेष्ठ आणि पवित्र असणारी.
ललितां- अत्यंत लालित्यपूर्ण असणारी.
भवानीं- भव म्हणजे भगवान शंकर. त्यांची चैतन्यशक्ती ती भवानी.
त्रय्यन्त- कोणत्याही वेदांचे संहिता, आरण्यक, ब्राह्मण आणि उपनिषद असे चार भाग असतात. उपनिषद हा चौथा भाग असल्याने त्याला, तीनच्या नंतर असणारा म्हणून त्रय्यन्त म्हटले. अर्थात त्रय्यन्त म्हणजे उपनिषद ,वेदान्त.
वेद्यविभवां- वेद्य म्हणजे स्पष्ट करण्याचे, जाणवून देण्याचे. तर विभव म्हणजे वैभव . अर्थात वेदांत तत्वज्ञानी जिचे वैभव स्पष्ट करते अशी. त्याद्वारे जिला जाणता येते अशी.
करुणानवद्याम्- करुणा अर्थात दया. अनवद्या अर्थात निर्दोष. सामान्य व्यवहारात दये मध्ये समोरच्याला आपल्यापेक्षा हीन समजणे आणि त्याच्यावर उपकार करणे. हा भाव असतो. तो दोष नसलेली दया म्हणजे वात्सल्याने आई परिपूर्ण आहे.
विश्वस्य – विश्वाच्या. सृष्टि-निर्मिती.
विलय- प्रलय, विनाश.
स्थिति- संचालन.
हेतुभूतां – या सगळ्याचे मूळ कारण असणारी.
विद्येश्वरीं- सर्व प्रकारच्या विद्या अर्थात ज्ञानाचे अधिष्ठान असणारी. निगम- वेदादि शास्त्रे, वाङ्गमनसा- वाणी आणि मनाने
विदूराम्- प्राप्त होणे असंभव असलेली.
अशा आई ललितांबेचे मी स्तवन करतो.
— विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply