श्री गणेश अवतारलीला ६ – श्री पुष्टिपती अवतार
कधीकाळी शकुनी नावाच्या राक्षसाचा पोटी दुर्मती नावाचा दैत्य जन्माला आला. दैत्य गुरु शुक्राचार्यांच्या उपदेशानुसार त्याने नवार्ण मंत्राने आदिशक्तीची आराधना केली.
अद्भुत वरदाने मिळाली की दैत्यत्व जागृत झालेल्या त्याने त्रैलोक्यावर विजय मिळविला.
त्याच्या शक्तीपुढे वनवासी झालेल्या देवता त्याच्या विनाशाचा विचार करीत असताना देवर्षी नारदांनी त्यांना गणेश उपासनेचा मार्ग सांगितला.
सर्वच श्रीगणेशाराधना करू लागले. त्यातही भगवान शंकर आणि देवी पार्वतीने षोडशाक्षरी मंत्राच्या आधारे विशेष तप आरंभले कारण अवतार त्यांच्या घरी होणार होता.
प्रसन्न झालेल्या श्री गणेशांनी अवतार घेण्याचे मान्य करूनही बराच काळ गेल्यावर श्री शंकर आणि पार्वती ने गणेश पार्थिव व्रत केले.
वैशाख शुद्ध पौर्णिमेला सूर्योदय समयाला भगवंतांनी त्याच मूर्तीतून पुष्टिपती अवतार धारण केला.
श्री शनींना त्यांची पत्नी निशी हिने दिलेला शाप या पुष्टीपतीं च्या दर्शनाने दूर झाला.
भगवान पुष्टिपतींचे दोन महान उपासक म्हणजे महर्षी अगस्ती आणि भगवान श्रीकृष्ण.
समुद्र प्राशनापूर्वी अगस्तीने श्री पुष्टीपतींचेच तप केले.
भगवान श्री कृष्णांनी मांडलेली दोन पुष्टिपती गणेश यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा आणि पुणे जिल्ह्यातील सुपे येथे विद्यमान आहेत.
भगवान गणेशांचे अत्यंत दिव्य फलदायी असणारे श्री सत्यविनायक व्रत याच पुष्टिपतींचे व्रत आहे. या व्रताचे उपासक देखील भगवान श्रीकृष्णच आहेत.ते प्रत्येक पौर्णिमेला हे व्रत करीत असे त्यात वर्णन आहे.
चतुर्थी सोडून असलेल्या या अवताराचा जन्मोत्सव आहे वैशाख शुद्ध पौर्णिमा.
जय श्रीपुष्टिपती.
— विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply