नवीन लेखन...

 श्रीरामाची शिवपूजा

हरि हराचे पुजन करतो  ।

दृष्य दिसे बहुत आगळे  ।।

प्रभूकडूनी प्रभूची सेवा  ।

सर्वजणां ही किमया न कळे  ।।

 

शिवलिंगापुढती ध्यान लावी  ।

डोळे मिटूनी प्रभू श्रीराम  ।।

सुंदर सुबक चित्रामध्ये  ।

व्यक्त होई ह्रदयातील प्रेम  ।।

 

श्रीराम प्रभूच्या पूजेवेळीं  ।

आत्मरुप उजळून आले  ।।

शिवलिंगातील रामस्वरुप  ।

एक होऊनी मग गेले  ।।

 

कोण भक्त आणि ईश्वर कोण ? ।

भासे मनी हे अवघड कोडे  ।।

परम बिंदूवर भक्ती असता  ।

ईश्वर भक्त दूजा न सांपडे  ।।

 

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

 

 

 

Avatar
About डॉ. भगवान नागापूरकर 2132 Articles
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..