नवीन लेखन...

श्री सरस्वतीची तसवीर

जीवनांतले चित्र पालटूनी,  रंग ते बदलले

जनी जनार्दन ठरविले,  सारे काय मिळविले  ।१।

सुंदर तसबीर एक आणली,  देवी श्री लक्ष्मीची

श्रद्धेचे भाव गुंतविले,  पूजा करूनी तिची  ।२।

शिक्षण घेवूनी ज्ञान मिळविले,  कष्टानें सारे

शरीर होते चैतन्यमय,  आणि धडपडणारे  ।३।

रंग बधितले जीवनांतील,  विविध छटांचे

सजविण्यास लागते त्या छटांना,  बळ संपत्तीचे  ।४।

ज्ञान आणि प्रयत्न जेव्हां,  एक ठिकाणी असे

प्रसन्न करण्या धन लक्ष्मीला,  अडचण येत नसे  ।५।

शक्ति, युक्ति, बुद्धी एकटवूनी,  परिश्रम केले

धनराशीचे अल्प भांडार,  त्याने जमविले  ।६।

तेज चमकले त्याच्या जीवनीं,  धन लक्ष्मीचे

समजूं लागला फार सुखी,  क्षण कर्तृत्वाचे  ।७।

माहीत नव्हते लक्ष्मी असते,  चंचल स्वभावी

केव्हां येईल जाईल कशी,  भंरवसा तो नाहीं  ।८।

चालत असतो खेळ नियतीचा,  गमतीनें सदा

कुणाचे फांस कसे पडतील,  कळेना अनेकदां  ।९।

कमाईस त्याच्या ओहोटी लागली,  व्यवहारामध्यें ती

प्रयत्न सारे फोल ठरूनी, अपयश येती  ।१०।

निराश बनले जीवन सारे,  अंध:कार झाला

दु:खाच्या त्या चटक्यामध्यें, जीव होरपळला  ।११।

मार्ग बदलले पूर्ण तयानें,  आपल्या जीवनाचे

धन कमविणें लक्ष नव्हते,  त्याच्या प्रयत्नांचे  ।१२।

वाचन करूनी चिंतन केले,  मन रमविण्या चित्ताला

ध्यान साधना देवूं लागली,  आनंद  त्याला  ।१३।

विसरूनी गेला हलके हलके,  दु:ख निर्धनतेचे

काव्य लेखनानें उघडले द्वार,  नव जीवनाचे  ।१४।

चकीत झाला एके दिवशीं,  बघूनी तसबिरीला

श्री लक्ष्मीचे ठिकाणी सरस्वतीचा,  बदल कुणी केला ?  ।१५।

 

— डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com

 

 

 

Avatar
About डॉ. भगवान नागापूरकर 2132 Articles
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..