अनेन स्तवेनादरादंबिकेशं
परां भक्तिमासाद्य यं ये नमंति |
मृतौ निर्भयास्ते जनास्तं भजंते
हृदंभोजमध्ये सदासीनमीशम् ‖ ३९ ‖
आता स्तोत्राच्या शेवटी फलश्रुती सादर करावीत अशा स्वरूपातील या दोन श्लोकांमध्ये आचार्य श्री प्रस्तुत स्तोत्राच्या पठना चे लाभ व्यक्त करीत आहेत.
आरंभीच्या दोन चरणात या स्तोत्राचा पठनाची पद्धती मांडताना आचार्यश्री म्हणतात,
अनेन स्तवेनादरादंबिकेशं – या स्तवनाच्या द्वारे ची आदरपूर्वक भगवान श्री अंबिकेशांचे स्तवन करतात,
परां भक्तिमासाद्य यं ये नमंति – परम भक्तीने युक्त होऊन जे त्यांना नमस्कार करतात.
अर्थात स्तोत्राचे पठन हे आदरपूर्वक आणि भक्तिपूर्वक असावे हे आचार्य श्री अधोरेखित करीत आहेत. तो केवळ उपचार नसावा किंवा स्वार्थ नसावा हे त्यात गृहीत आहे.
अशा सांगितलेल्या मार्गाने या स्तोत्राचे पाठ करतात त्यांना मिळणारी दोन अद्वितीय लाभ सांगतांना आचार्य म्हणतात,
मृतौ निर्भयास्ते- ते निर्भयपणे मृत्यूला सामोरे जातात. जनास्तं भजंते- लोक त्यांची उपासना करतात.
यात त्याच्या स्वतःच्या जीवनाचे कल्याण होते हे त्याच्या निर्भय मृत्यूतून वर्णन केले. सोबतच तो इतरांच्या जीवनाचे कल्याण करतो. त्यांनाही शिव मार्गाला लावतो हे दुसऱ्या उल्लेखात आचार्य स्पष्ट करीत आहेत.
यासाठी जीवनाचे साफल्य कशात आहे? हे सांगताना आचार्य म्हणतात,
हृदंभोजमध्ये सदासीनमीशम् – सदैव आपल्या हृदयकमळात निवास करणाऱ्या भगवान शंकरांचे स्मरण करावे.
तोच आपल्या परम कल्याणाचा मार्ग आहे.
— प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply